कवयित्री मालती मडावी- सेमले यांना कवितावाचनासाठी भारतीय साहित्य अकादमीचे निमंत्रण

कृष्णकुमार निकोडे

मो: ७७७५०४१०८६    

सांस्कृतिक मंत्रालय व साहित्य अकादमी दिल्ली तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय कविसंमेलन 

दिनांक ३ ते ६ ऑगस्ट २०२३ला मध्यप्रदेशातील भोपाळ येथे होत आहे. या आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात गडचिरोली येथील प्रसिद्ध आदिवासी कवयित्री मालती मडावी- सेमले यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कविसंमेलनात जगभरातील ३८ देशातील जवळपास ७० भाषांचे कवी, लेखक, विचारवंत प्रतिनिधित्व करणार आहेत.

     उन्मेष या शीर्षकाने होणाऱ्या या कविसंमेलनात मालती मडावी- सेमले या आदिवासी संस्कृती, आदिवासी जनजीवन, त्यांच्या जगण्याच्या विविध अंगांचा परामर्श घेणाऱ्या निवडक कविता सादर करतील. आदिवासींच्या एकूणच जीवनाशी समरस होणाचे आणि त्यांच्या प्रश्नांना, त्यांच्या अभिव्यक्तिला वाचा फोडण्याचे काम मालती मडावी- सेमले यांनी सातत्याने आपल्या कवितांच्या माध्यमातून केलेले आहे. साहित्य अकादमीने कविता वाचनासाठी आमंत्रित करणे ही गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रासाठी आनंददायी व अभिमानास्पद बाब आहे. मालती मडावी- सेमले यांचा त्यांच्या प्रकाशित पुस्तकांमुळे महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. तसेच गडचिरोली येथे नुकतेच पार पडलेल्या देशोन्नती मनस्विनी आयोजित लावणी व मंगळागौरी नृत्य स्पर्धा कार्यक्रमात उत्कृष्ट कवयित्री म्हणून सत्कार केलेला आहे. त्या झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीच्या सक्रिय सदस्या आहेत.

        त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे, अशी माहिती आमच्या कार्यालयास श्री कृष्णकुमार जी. निकोडे गुरूजींनी पुरविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here