तुकाराम वारघडे यांच्या प्रयत्नांनी शेकडो निराधार महिलांना मिळाला रोजगार…

लक्ष्मण सोनवणे

इगतपुरी प्रतिनिधी

अनेक संकटे झेलत संसाराला हातभार लावणाऱ्या अनेक महिलांना रोजगार मिळण्यासाठी नेहमीच अडथळ्यांची शर्यत करावी लागते. याप्रकारे रोजगाराच्या शोधात असलेल्या इगतपुरी तालुक्यातील शेकडो निराधार महिलांसह गरीब परिस्थिती हलाखीचे जीवन जगणाऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी रोजगार मिळवून दिला आहे. याबद्धल महिलांकडून तुकाराम वारघडे यांचे आभार मानले जात आहेत. गरजू महिलांना अनेक कंपन्यांचे उंबरठे झिजवून सुद्धा काम मिळत नव्हते. यामुळे महिलांनी काम मिळावे यासाठी श्री. वारघडे यांच्याकडे कैफियत मांडल्यानंतर त्यांनी तात्काळ पुढाकार घेऊन गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांकडे पाठपुरावा केला. त्याला यश येऊन महिलांच्या हाताला आता काम मिळाले आहे. इगतपुरी तालुक्यातील शेकडो महिलांना हक्काचा रोजगार मिळवून दिल्याबद्धल तुकाराम वारघडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

माता भगिनी आणि युवकांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणार – सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे 

महामार्ग, रेल्वे, लष्कर, धरणे, समृद्धी आणि अनेक शासकीय प्रकल्पासाठी तालुक्याच्या जमिनी संपादन केलेल्या आहेत. मात्र बाधित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून दिला जात नसल्याने ते हतबल झाले आहेत ह्या सर्व स्थानिक तरुणांना विविध कंपन्यांमध्ये काम मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे तुकाराम वारघडे यांनी सांगितले. इगतपुरी तालुक्यात बेरोजगारांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अनेक कंपन्यांमध्ये अनेकदा प्रयत्न करूनही काम द्यायला टाळाटाळ केली जाते. राष्ट्रीयकृत बँका रोजगारासाठी युवकांना कर्ज द्यायला नाखुष असतात. अनेक कारणे सांगून युवकांची बोळवण करतात. यामुळे इगतपुरी तालुक्यातील युवक अधिकच वैफल्यग्रस्त होत आहेत. यामुळे सर्व घटकांना आगामी काळात एकत्र करून रोजगार मिळवून देण्यासाठी कृतिशील राहणार आहे. महत्वाचे म्हणजे निराधार महिला भगिनींना रोजगार मिळवून दिला याचे समाधान वाटत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी बोलताना सांगितले.

समाजातील विकासाचा महत्वाचा घटक म्हणजे महिला आहेत. कोणताही विकास हा महिलांच्या प्रगतीबरोबर होणे शक्य आहे. महिलांना रोजगार मिळवून देऊन सक्षम करणे गरजेचे आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी तत्पर असणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक महिलेला आपल्या हक्काची, अधिकाराची, समस्याची जाणीव झाली पाहिजे. आगामी काळात रोजगार नसलेल्या महिलांसाठी व सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणार आहे – तुकाराम वारघडे, सामाजिक कार्यकर्ते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here