असाक्षर व्यक्तींना शालेय साहित्याचे वाटप

180

कोपरगाव येथे असाक्षर व्यक्तींना शालेय साहित्याचे वाटप

सुनील भालेराव.

अहिल्यानगर प्रतिनिधी

बुधवार दिनांक २३/७/२०२५ रोजी जनता इंग्लिश स्कूल. संवत्सर ता. कोपरगाव येथे नवभारत साक्षरता अभियान २०२५/२६. अंतर्गत विद्यालयातील सर्व शिक्षकांनी संवत्सर गावातील कुटुंबांना प्रत्यक्ष गृहभेटी करून असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण केले. असाक्षर व्यक्तींना साक्षर करण्याच्या दृष्टीने विद्यालयामार्फत मोफत शैक्षणिक साहित्यांचे (अंकलीपी, पाटी पेन्सिल) स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या मार्फत असाक्षर व्यक्तींना वाटप केले. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. मोरे आर.एस.सर यांनी आपल्या मनोगतातून असाक्षर व्यक्तींना साक्षर झाल्यानंतरचा आनंद विलक्षण असेल तसेच शासनाच्या योजनेचा फायदा गावोगावी असणाऱ्या असाक्षर व्यक्तींना होऊन शासनाचा उद्देश सफल होईल असे प्रतिपादन केले.

सदर कार्यक्रम प्रसंगी पर्यवेक्षक जेजुरकर व्हि. के. सर विभाग प्रमुख श्री पाकले ओ.बी. सर. ज्येष्ठ शिक्षक श्री भोये सर श्री सांगळे सर श्री शिंदे सर श्री ढोले व्हि.के.सर श्रीमती चौधरी पी. आर. व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री खेताडे जे . व्हि. यांनी केले. तसेच आभार श्री मोरे व्हि.बी.यांनी मानले.