वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व ग्रंथ दिंडीचे आयोजन

223

वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व ग्रंथ दिंडीचे आयोजन

सुनील भालेराव

अहिल्यानगर प्रतिनिधी

बुधवार दिनांक २३/७/२०२५ रोजी जनता इंग्लिश स्कूल, संवत्सर तालुका कोपरगाव येथे वसुंधरा दिनानिमित्त वृक्षदिंडी व ग्रंथ दिंडीचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ढोल ताशांच्या गजरात भव्य फेरीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी फेरीत ग्रंथांचे वृक्षांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व दर्शवणारे वाचन फलक व त्यावर आधारित प्रबोधनात्मक घोषणा दिल्या. 

 

सदर कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मोरे . आर.एस. यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आपल्या विद्यार्थी जीवनातील ग्रंथांचे महत्त्व सांगताना राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण दिले. तसेच वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व सांगताना संत तुकाराम महाराजांचे वृक्ष संपत्ती बद्दलचे विचार सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. खेताडे जे.व्हि.यांनी केले. तर आभार श्री शिंदे बी एम यांनी मानले. यानंतर विद्यालयाच्या मैदानात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मोरे. आर. एस. पर्यवेक्षक श्री जेजुरकर. व्ही. के.विभाग प्रमुख. श्री.मोरे. व्हि. बी. व ग्रंथपाल श्री. दिवे. एस.व्ही. यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक. श्री भोये. श्री सांगळे. श्री शिंदे .श्री लोहरे. श्री बोढरे. श्रीमती चौधरी. श्रीमती महामुनी.श्रीमती नागरे. श्रीमती राठोड, विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.