जिल्ह्यातील खेळाडूंना मिळणार ओळखपत्र

जिल्ह्यातील खेळाडूंना मिळणार ओळखपत्र

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील सर्व वयोगटातील व खुल्या गटातील सर्व खेळाडूंच्या नोंदणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व खेळाडूंची नोंदणी करून त्यांना कायम स्वरुपी ओळखपत्र देण्यात येणार आहे. या ओळखपत्रावर प्रत्येक खेळाडूच्या संपूर्ण माहितीसह खेळाडूचा कायमस्वरूपी नोंदणी क्रमांक असणार आहे. प्रत्येक खेळाडूला आपली नोंदणी करणे बंधनकारक असून, नोंदणी केलेल्याच खेळाडूंना रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन व सर्व मान्यता प्राप्त स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या संदर्भात रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील सर्व क्रिकेट क्लब, अकॅडमी व क्रिकेट संघांच्या प्रतिनिधींसाठी संवाद शिबिराचे आयोजन करून त्यांना खेळाडूंच्या नोंदणी विषयी संपूर्ण माहिती देण्यात आली. जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांच्यावतीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.