*हिंगणघाट:- मुकेश चौधरी* हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती ने महाराष्ट्र शासनाची कुठलीही परवानगी न घेता हिंगणघाट तालूक्यातील कानगाव येथे बोगस कृषी उपबाजार सुरु करून कोट्यावधी रूपयाची उधळवणुक करुन शासनाचा पैसाला शेंडी लावल्याचा धकादायक प्रकार RTI माहिती अधिकार कायदा अंतर्गत मागण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर समोर आला.
२००५ पासुन कानगाव येथे बोगस उपबाजार चालविणारा आणि त्यावर बोगसरित्या कोट्यावधी रूपयाची उधळवणुक करणारा, हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचा सभापती सुधीर कोठारी, संपुर्ण संचालक मंडळ आणि सचिव तुकाराम चांभारे, यांची कृषि उत्पन्न बाजार समितीमधुन हकालपट्टी करून, शासनाने या बाजार समितीवर तत्काळ प्रशासक नेमण्यात यावा अशे लोकांचे मनने आहे !
तसेच शासन व जनतेची फसवणुक करून, शासनाची परवानगी नसलेल्या या बोगस उपबाजारावर कोट्यावधी रूपयाचे बांधकाम आणि कर्मचार्‍यावर लाखो रुपयाची उधळपट्टी केल्याबाबत सभापती, संचालक मंडळ, सचिव यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करून, बोगस कानगाव उपबाजारावर खर्ची झालेली सर्व रक्कम त्यांचेकडुन वसुल करावी!
आपण आतापर्यंत बोगस शाळा, बोगस कंपण्या पाहील्या ! मागे तर आंध्र मध्ये अगदी हुबेहुब बोगस स्टेट बॅंक आॅफ इंडिया ची शाखा सुध्दा पाहीली! पण वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे, फार मोठा गाजावाजा करणार्‍या, स्वत:च्या प्रसिध्दीसाठी शेतकर्‍यांच्या कृषि उत्पन्न बाजार
समितीच्या पैशातुन लाखोच्या जाहीराती देणारा बाजार समितीचा सभापती सुधीर कोठारी तब्बल १६ वर्षापासुन, सहकारी जिल्हा उपनिबंधक व सरकार यांच्या नाकावर टिच्चुन, कानगाव येथे बोगस उपबाजार चालवित आहे!
एवढेच नाही, तर शासनाची या उपबाजाराला कोणतीही परवानगी नसतांना दिनांक २१.५.२००५ ला या उपबाजाराचे तत्कालीन आमदार राजुभाऊ तिमांडे यांचे हस्ते बोगस उदघाटन केले!
या सुधीर कोठारीची एवढ्यावरच मजल गेली नाही, तर याने शासन व बाजार समीती आणि शेतकर्‍यांच्या पैशामधुन कोट्यावधी रूपयाची अवैध बांधकामे या कानगाव उपबाजारात केलेली आहे! त्यातुन बख्खळ कमीशेणही खाल्ले आहे! या शिवाय हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचा स्टाॅप या बोगस कानगाव उपबाजार मध्ये पाठवुन, त्यांचेवर लाखो रूपयाचे बेकायदेशिर वेतनही खर्ची घातले आहे!अशा प्रकारे हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचा सभापती सुधीर कोठारी याने, बोगस कानगाव उपबाजार चालवुन, सरकार, सहकार विभाग आणि शेतकरी यांची फसवणुक केली आहे!
हा प्रकार ज्यावेळी हिंगणघाट बाजार समीतीच्या हिंगणघाट येथील मुख्य बाजार मधील इलेक्र्टीशियन साटोने यांची बदली या बोगस कानगाव उपबाजार येथे केली, तेंव्हा हा प्रकार उघडकीस आला!वास्तविक साटोने ईलेक्र्टीशियन यांची हिंगणघाट मुख्य बाजार शिवाजी मार्केट येथील दोन इलेक्र्टीक ट्रान्सफर आणि इलेक्र्टीक उपकरणे यांचे देखरेखीसाठी अतिरिक्त/ विशेष पद निर्माण करून झालेली आहे! असे असतांना सभापती सुधीर कोठारी यांनी सर्व नियम आणि कायदे झुगारून साटोने यांची बदली कानगाव उपबाजार येथे केली. जिथे साटोने यांचे पद तर नाहीच, पण हा कानगाव उपबाजारही बोगस आणि बेकायदेशिर आहे!
*या बाबत माहीती अधिकारात माहीती घेतल्यानंतर व बाजार समितीची वेबसाईट पाहील्यावर, सभापती सुधीर कोठारी याचा हा बोगसपणा तसेच बेकायदेशिरपणा उघडकीस आलेला आहे!
त्यामुळे आता २००५ पासुन कानगाव येथे बोगस उपबाजार चालविणारा व त्यावर बोगसपणे कोट्यावधी रूपयाचे बोगस बांधकाम करून कमीशण खाणारा हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीचा सभापती सुधीर कोठारी, संचालक मंडळ आणि सचिव तुकाराम चांभारे यांची बाजार समिती मधुन हकालपट्टी करून, या हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीवर तत्काळ शासनाचा प्रशासक बसविण्यात यावा, अशी सहकार आयुक्त, सहकार सचिव, व पणन संचालक यांचेकडे मागणी करण्यात येत आहे! तसेच सुधीर कोठारी यांनी २००५ पासुन बोगस कानगाव उपबाजार चालवून त्यावर कोट्यावधी रूपयाचा अपव्यवहार व अपहार केल्यामुळे, तसेच या बोगस उपबाजारामुळे, सरकार, सहकारविभाग, शेतकरी आणि कर्मचारी यांची फसवणुक केल्यामुळे, सभापती सुधीर कोठारी, संपुर्ण संचालक मंडळ आणि सचिव श्री तुकाराम चांभारे यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, व या बोगस कानगाव उपबाजारावर आजपर्यंत खर्च केलेली सर्व रक्कम सुधीर कोठारी व संचालक मंडळ यांच्याकडुन वसुल करण्यात यावी, अशी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे मागणी केलेली आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here