32 वर्षिय विवाहीत महिलेचं अपहरण करून 14 नराधमानी केला सामुहीक बलात्कार.

32 वर्षिय विवाहीत महिलेचं अपहरण करून 14 नराधमानी केला सामुहीक बलात्कार.

32 वर्षिय विवाहीत महिलेचं अपहरण करून 14 नराधमानी केला सामुहीक बलात्कार.
32 वर्षिय विवाहीत महिलेचं अपहरण करून 14 नराधमानी केला सामुहीक बलात्कार.

MVN क्राईम रिपोर्टर✒

पाटणा,दि.24 ऑगस्ट:- देशात महीला अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची स्थिती दिसून येत आहे. आज देशात कुठेही महिला सुरक्षित नाही असल्याची अनेक घटनेवरुन समोर येत आहे. अशिच एक संतापजनक घटना बिहार राज्यातून समोर आली आहे. एका 32 वर्षीय विवाहित महिलेवर 14 नराधानी मिळुन सामूहिक बलात्कार केला. या नराधमांनी आधी या महिलेचं अपहरण केलं आणि यानंतर तिला नदीच्या किनाऱ्यावर घेऊन गेले. इथे आरोपींनी सर्व हद्द पार करत महिलेवर सामूहिक बलात्कार केला. घटनेची माहिती मिळताच जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा आरोपींनी आपले कपडे तिथेच सोडले आणि नग्नावस्थेतच ते पळत सुटले. आरोपींनी आपल्या चपलाही तिथेच सोडल्या. ही घटना बिहारच्या गया येथील आहे.

14 नराधामानी एका महीलेवर अत्याचार केल्याने पीडित महिलेची अवस्था सध्या खुप गंभीर आहे. महिलेला गयाच्या मगध मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना फस्सिल ठाण्याच्या क्षेत्रातील आहे.

असं सांगितलं जात आहे, की दोन युवक महिलेला उचलून आपल्या गाडीवरून फल्गु नदीवर घेऊन गेले. याचठिकाणी आरोपींनी महिलेवर बलात्कार केला. काही वेळानंतर 5 बाईकवर बसून आणखी 12 जण याठिकाणी आले. या सर्वांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. जेव्हा पीडितेनं याचा विरोध केला तेव्हा आरोपींनी तिला जबर मारहाण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला जेव्हा दोन युवक महिलेला घेऊन नदीच्या काठावर आले तेव्हा आसपासच्या गावातील लोकांनी त्यांना पाहिलं. मात्र, अंधार असल्यानं कोणाला काहीच समजलं नाही. काही वेळानंतर जेव्हा गाड्यांवर 12 जण नदीकडे जाताना दिसले तेव्हा गावातील लोकांना शंका आली.

यानंतर गावातील काही लोकांनी नदीच्या कडेला जाऊन पाहिल्यानंतर त्यांना या घटनेबद्दल समजलं. यानंतर गावातील लोकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना काहीच समजलं नाही, नंतर त्यांची नजर बाईकवर गेली आणि यानंतर नदीत उड्या घेत पोलीस मध्यभागी असलेल्या बेटावर पोहोचले. पोलिसांना येताना पाहून आरोपी कपडे न घालताच नग्नावस्थेत पळत सुटले. पोलिसांनी आरोपींचे कपडे आणि चपला ताब्यात घेतल्या आहेत. तर, महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या महिलेची अवस्था गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.