वर्धा येथील डॉ आंबेडकर पुतळ्याजवळील पेट्रोल पंप हटविण्यासाठी हिंगणघाट येथे तालुकास्तरीय भव्य धरणे आंदोलन

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
हिंगणघाट- दि. २४/०८/२०२१ रोज मंगळवार
वर्धा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील पेट्रोलपंप हटवून दुसरीकडे घेऊन जाण्याच्या मागणीसाठी आज पेट्रोल पंप हटाव कृती समिती च्या वतीने उपविभागीय कार्यालया समोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. आजच्या धरणे आंदोलनात डॉ आंबेडकरी विचारांच्या १७ संघटना सहभागी झालेल्या होत्या.
या संदर्भात दिलेल्या निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार, या पुतळा परिसरात वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, कार्यक्रम होतात. या परिसरात विविध शासकीय कार्यालये आहेत. हजारो नागरिक कामाच्या निमित्ताने या ठिकाणी येतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला माल्यार्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करतात आणि विविध कार्यक्रम नेहमीच करण्यात येते. शिवाय या परिसरातील पोलीस मुख्यालया जवळ गॅस सिलेंडरचे गोडाऊन, स्फोटक दारूगोळ्यांचे गोदाम, मंगल कार्यालय आहे एवढे वर्दळीच्या ठिकाणी ज्वलनशील पेट्रोलपंप झाल्यास अपघात होऊन नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. या मुळे हा नियोजित पेट्रोलपंप या ठिकाणाहून हलवून अन्यत्र सुरक्षित जागी करावा अशी या आंदोलकांची मागणी आहे.
आज सकाळी ११.०० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून एका मोर्चाने हे आंदोलक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर ११ ते ४ या वेळात शांततेत धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर एका शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले व पोलीस निरीक्षक मा. संपत चव्हाण यांच्या उपस्थितीत वरील संदर्भात एक निवेदन सादर केले.
आजच्या धरणे आंदोलनाचे नेतृत्व वर्धेचे माजी नप अध्यक्ष मा. नीरज गुजर, मा. अनिल जवादे, माजी नगरसेवक मा. अशोक रामटेके, मा. महेंद्र मुनेश्वर, मा. सुभाष सहारे, मा. शंकर मुंजेवार, मा. गोरख भगत, मा. गोकुल पाटील, मा. विक्रात भगत, मा. राजू भगत, मा. अनुला सोमकुवर, मा अस्मिता भगत, मा. मंगला कांबळे, मा. रसपाल शेंद्रे, मा. संजय दारुंडे, मा. आर.सी. पाटील आणि मा. अनिल मुन यांनी मार्गदर्शन केले.
या धरणे आदोलनाच्या यशस्वीतेसाठी सुप्रसिद्ध गायक मा. संघर्ष थूल व संच याच्या गीतांचा कार्यक्रम झाले. त्याच प्रमाणे कुणाल वासेकर, ललित धनविज, मनोज वासेकर, सुहास जीवनकर, अजय सोरदे, राजू मेश्राम, विजय तामगाडगे, अरूण डांगे, संध्या जगताप, अजय डांगरे, राजकपूर नगराळे, अश्विनी पाटील आणि सर्व आंबेडकरी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.