मुंबई, घाटकोपर पश्चिम येथे भाजपचे सौ.पूनम बोराटे (नायर) तर्फे पोलीस बांधवाना राखी बांधून रक्षाबंधन साजरा.

✒ आसिफ तैय्यब शेख, मुंबई प्रतिनिधी✒
🗞 9324470108
📞 9323666616
मुंबई : – आपले कर्तव्यदक्ष खासदार मनोज भाई कोटक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार श्री.राम कदम यांचे मार्गदर्शनाखाली तसेच श्री. जिल्हा अध्यक्ष यांचे मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक १२६ मध्ये सर्व पोलीस ठाणेत जाऊन रक्षाबंधन सन साजरा करणेत आला. यावेळी सौ.मनीषा भांडारकर, सौ.मनीषा तुपे, सौ.नुपूर सावंत, सौ.संगीता वर्पे, सौ.श्रुती जाधव आणि सर्व भाजप महिला उपस्थित होत्या.
पोलीस ठाणेचे चिरागनगर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीयुत जितेंद्र आगरकर साहेब यांचे आशीर्वाद घेतले. पोलीस निरीक्षक कोकाटे साहेब आणि सर्व पोलीस बंधूनी मिळून रक्षाबंधन सन साजरा केला. विभागातील सामाजिक कायदा आणि सुव्यस्था अबाधित ठेवण्याकरिता चिराग नगर पोलीस ठाणे सतत डोळ्यात तेल घालून आपले कर्तव्य बजावीत असताना जनतेने देखील पोलिसाना सहकार्य करावे अशी आग्रही मागणी पोलीस वर्गांकडून कारणेंत आली.
बहीणभावाच्या मनातील प्रेम भावना जपणारा हा राखी पौर्णिमेचा उत्सव आहे. कोरोना काळात आपण जे कार्य करत आहेत, त्याची परतफेड करता येणार नाही, परंतु या बहिणींच्या रक्षाबंधनाने आपले कर्तव्य बजाविण्यात नक्कीच अधिक बळ मिळेल, म्हणून भारतीय जनता महिला तर्फे हा एक छोटासा प्रयत्न केला आहे.