हिंगणघाट शहरात डेंगूने महिलेचा मृत्यू, नगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्या : सर्व रुग्णालय हाऊसफुल्ल

✒मुकेश चौधरी✒
उप संपादक मिडिया वार्ता न्यूज़
मो. 7507130263
हिंगणघाट :- शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढलेला असून डेंग्यूच्या आजाराने येथील अब्दुला नगर येथे राहणाऱ्या शोभा विघ्नेश्वर निमजे (वय 5२) या महिलेचा आज मृत्यू झाला. निमजे यांना तीन दिवसापूर्वी डेंग्यूची लागण झालेली होती. प्रकुर्ती अस्वस्थतेने त्यांना नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.त्या येथील भारतीय स्टेट बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी विघ्नेश्वर निमजे यांच्या पत्नी आहे. त्यांच्यामागे दोन मुली आणि आप्त परिवार आहे. शहरात दीड महिन्यापासून डेंगू चा प्रकोप वाढला असून घराघरात डेंगू तसेच साथीच्या आजाराचे रुग्ण आढळून येते आहे. मागील आठवड्यात मनसेचे युवाशाखेचे प्रमुख राहुल सोरटे आणि घटवाई नगर येथे राहणारी युवती भाग्यश्री पराते हिचा डेंगूची लागण झाल्याने मृत्यू झाला होता. या युवकांच्या मृत्यू मुळे जनमानसात या आजाराविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विविध संघटनांनी ही बाब नगरपालिकेच्या निदर्शनास आणून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे. डेंगू आजार आता गंभीर वळण घेत आहे. नगरपालिकेच्या सफाई कामगारांचा संप सुरु आहे. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अस्वच्छतेमुळे यातून डेंग्यूसारख्या आजाराला चालना मिळत आहे शहरातील सर्व खाजगी रुग्णालय साथरोगाच्या रुग्णांनी हाऊसफुल्ल आहे. नगरपालिका प्रशासनाने या गंभीर समस्येला प्राथमिकता देऊन तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.