अस्वती दोरजे नागपूरच्या नव्या सहपोलीस आयुक्तपदी नियुक्ती.

✒युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर :- राज्यातील अनेक आय.एस आणि आय.पी.एस अधिका-याच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यात नागपुर येथील गेल्या दीड वर्षापासून रिक्त असलेल्या सहपोलीस आयुक्तपदी अस्वती दोरजे यांची नियुक्ती झाली आहे.
गृह विभागाने आज राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीची यादी जाहीर केली. त्यानुसार दोरजे यांना नागपूर शहराच्या सहपोलीस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. छेरिंग दोरजे हे नागपूर परिक्षेत्राचे नवे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून बदलून येणार असून, आतापर्यंत या पदावर असलेले चिरंजीव प्रसाद यांची राज्य राखीव पोलिस दलाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून मुंबईला बदली झाली आहे. दोरजे दाम्पत्याने यापूर्वी विदर्भात सेवा दिली आहे. छेरिंग दोरजे यांनी चंद्रपूर तर अस्वती दोरजे यांनी वर्धा येथे पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. अस्वती या प्रख्यात दाक्षिणात्य चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पद्मविभूषण व दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अदूर गोपालकृष्णन यांच्या कन्या होय.
आता दोरोजे याच्यावर नागपुर मधील वाढता क्राईम रेट, अवैध धंदे, महिला अत्याचार यावर आळा बसवण्याची मोठी जबाबदारी आली आहे.