*नारायण राणे यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करा.*

✒अमोल माकोडे✒
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
ब्रम्हपुरी : -शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करा. अशी मागणी पोलीस उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या कडे केली.
केंद्रीयमंत्री पदाचा दुरुपयोग करून अतिशय खालच्या पातळीवर वक्तव्य करणाऱ्या राणे यांना मोदींनी समजूत घालावी. जाहीर माफी मागावी, अन्यथा अन्यथा शिवसैनिक शिवसेना स्टाईलने उत्तर देतील, असा इशारा देण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या विरोधात राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्र राज्यात शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यामुळे त्यांच्यावरती आपण तात्काळ गुन्हा नोंद करून पुढील कायदेशीर कारवाई करावी.
यावेळी उपजिल्हा प्रमुख मिलिंद भणारे,तालुका प्रमुख नरू नरड,शहर प्रमुख किशोर चौधरी,तालुका संघटक खुर्शीद शेख,उपतालुका प्रमुख पराग माटे, कवडू पिंपळकर, शामाभाऊ भणारकर,महिला उपजिल्हा संघटिका वीणाताई घोडपागे,तालुका संघटिका जयताई कंनाके,सुरेखाताई पारधी, रेवतीताई बालपांडे,युवासेना उपशहर प्रमुख आशिष गाडंलेवार,अमोल ठिकरे आधी शिवसैनिक,युवासैनक,महिला आघाडी उपस्थित होते.