नारळी पौर्णिमेनिमीत्य सैनीकाच्या हस्ते मोवाड येथे वृक्षारोपण

नारळी पौर्णिमेनिमीत्य सैनीकाच्या हस्ते मोवाड येथे वृक्षारोपण

नारळी पौर्णिमेनिमीत्य सैनीकाच्या हस्ते मोवाड येथे वृक्षारोपण
नारळी पौर्णिमेनिमीत्य सैनीकाच्या हस्ते मोवाड येथे वृक्षारोपण

युवराज मेश्राम
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914

नागपूर ( मोवाड,) :- वृक्ष सवर्धन व पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने स्थानीक मोवाड बाजार चौक विठ्ठल रखुमाई मंदीर देवस्थान परीसरात नारळी पौर्णिमेचे औचित्य साधुन वृक्षारोपण करण्यात आले. दरम्यान आर्मी मेडीकलमध्ये राॅंची येथे कार्यरत असलेले सैनिक घनशाम भद्रे, यांचे प्रमुख ऊपस्थीतीत व त्यांचे हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी मोवाड येथील वृक्षमीत्र तुषार वाडबुध्ये , योगशिक्षक श्रीकांत मालधुरे , होमगार्ड निलेश जाधव , मनीष भद्रे , तसेच सागर शेंबेकर यांची यावेळी प्रामुख्याने ऊपस्थीती होती.

सैनीक घनशाम भद्रे हे रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्य मोवाड येथे आले होते. वृक्षलागवडी दरम्यान पिंपळ, वड, कडुनिंब, प्राजक्त, तसेच आरोग्यवर्धक गुळवेल या वृक्षांची यावेळी लागवड करण्यात आली. याआधीही तात्कालीन मोवाड न. प. मुख्याधीकारी सिध्दार्थ मेश्राम यांच्या कार्यकाळात मोवाड शहरात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यांचाच आदर्श घेत येथील वृक्षमीत्र तुषार वाडबुध्ये यांनी बाजार परीसरात वडाची , पिंपळाची तसेच इतर आरोग्य वर्धक वृक्षांची लागवड करून संपुर्ण बाजार परीसराला सौंदर्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.