*तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करा*
*आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे कार्यकारी अभियंत्यांना सूचना*
*राष्ट्रवादी काँग्रेसने आ.धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन दिले*

*आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे कार्यकारी अभियंत्यांना सूचना*
*राष्ट्रवादी काँग्रेसने आ.धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन दिले*
अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335
*अहेरी:*- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार यांनी अहेरी शहरातील मुख्य रस्त्यांचे दुरुस्ती करण्यात यावे अशी मागणी करून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना मंगळवार 24 आगष्ट रोजी निवेदन दिले.
निवेदन माजी नगरसेवक शैलेश पटवर्धन, मखमुर शेख, आफ्रिदी सैय्यद, विनोद रामटेके, सुमित मोतकुरवार, बालाजी गावडे, मांतय्या आत्राम आदींनी दिले.
निवेदनाची दखल घेऊन आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम यांना कार्यालयात बोलावून तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती व डागडुजी करण्याचे सूचना केले. यावर अभियंता अतुल मेश्राम यांनी लवकरच कामाला प्रारंभ करून रस्त्यांची दुरुस्ती करणार असल्याचे सांगितले. आता लवकरच अहेरी-आलापल्ली, महागाव व अन्य मुख्य रस्त्यांची दुरुस्ती होणार आहे.