प्रामाणिक प्रयत्न केल्यास उद्दिष्ट पूर्ती शक्य –
संजय आखाडे( प्रवर डाक अधीक्षक )
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀8554920002🪀
सामान्य गोरगरीब जनतेत पोस्ट ऑफिस ची गोडी वाढावी व विभागाकडून देण्यात आलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी गोरगरीब सामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांना डाक विभागातील विविध योजनांचा लाभ पटवून सांगण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास उद्दिष्ट पूर्ती शक्य असल्याचे प्रतिपादन आज प्रवर डाक अधीक्षक संजय आखाडे अकोला यांनी मालेगाव पोस्ट ऑफिस मध्ये आज 22 ऑगस्ट ला आयोजित ग्रामीण डाक सेवकांच्या कामकाज आढावा बैठकी प्रसंगी केले
मालेगाव तालुक्यातील शिरपूर व मालेगाव सब ऑफिस अंतर्गत येत असलेल्या एकूण 34 शाखा घरांमधील उपस्थित ग्रामीण डाक सेवकांचा सन 2022 -23 कामकाजाचा आढावा व उद्दिष्ट पूर्ती बैठकीचे आयोजन मालेगाव पोस्ट ऑफिस मध्ये होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्ही एम मुंडे पोस्ट मास्तर मालेगाव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रवर डाक अधीक्षक संजय आखाडे अकोला व उपविभागीय डाक निरीक्षक एस ननीर वाशिम हे होते यावेळी प्रवर डाक अधीक्षक अकोला यांनी सर्व शाखा डाक घरांच्या कामाचा आढावा घेतला व डाक सेवकांच्या समस्या जाणून घेतल्या तर उद्दिष्टपुरतेसाठी डाक विभागाच्या अधिकतम व्याज देणाऱ्या आर डी पीपी एफ आकर्षक योजनेचा लाभ डाक सेवकांनी घराघरात महत्व पटवून सांगितल्यास उद्दिष्ट पुरती अशक्य नसल्याचे सांगून तीन मूलमंत्र डाक सेवकांना दिले डाक सेवकांनी गावागावात व्हाट्सअप चा ग्रुप बनवून डाक विभागाच्या विविध योजनांचा प्रचार व जनजागृती करावी असे म्हणाले यावेळी मेलवर शीअर विजय खराटे व भागवत नवघरे तसेच पोस्टल असिस्टंट सचिन कड योगेश आरू सुनील गायकवाड यांच्यासह तालुक्यातील ग्रामीण डाक सेवक उपस्थित होते✍