चितळाच्या अवयवांची तस्करी, पाच जणांना अटक

चितळाच्या अवयवांची तस्करी,
पाच जणांना अटक

चितळाच्या अवयवांची तस्करी, पाच जणांना अटक

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351

वरोरा : 22 ऑगस्ट
चितळाच्या अवयवांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती वनविभागास प्राप्त झाली. वन विभागाने बनावट ग्राहक पाठवून सौदा पक्का केला. त्यानंतर संशय आल्याने आरोपी, वाहनाने शेगावकडे पळाले. वनविभागाने शेगाव पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी ते वाहन अडवले व वाहनासह पाच व्यक्तींना अटक करून वनविभागाच्या ताब्यात दिले.
एमएच ३४ ए २९०४ या क्रमांकाच्या स्कार्पिओ वाहनाने आलेले ते पाचही व्यक्ती गुजगवान गावानजीकच्या एका बियर बारमध्ये बसले होते. हे पाच व्यक्ती चितळाचे शिंगे विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाने त्यांच्याजवळ बनावट ग्राहक पाठविला.
सौदा पक्का झाला. परंतु, त्या पाचही व्यक्तींना संशय आल्याने त्यांनी मुद्देमाल शेगावमध्ये ठेवला असल्याने शेगावमध्ये जावे लागेल, असे म्हणत आपले वाहन भरधाव वेगाने घेऊन निघाले. त्यांच्या मागे वनविभागाचे अधिकाऱ्यांचे वाहन होते. वनविभागाने शेगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. शेगाव पोलिसांनी ते स्कार्पिओ वाहन नाकाबंदी करून अडविले. वाहनांमधील अनिकेत सतीश श्रीवास्तव, नितीन जयस्वाल, मुधोळ मुकुंद खोडे, विजय शंकरदेवनारायण म पाठक, राहुल सुभाष खोब्रागडे यांना शेगाव पोलिसांनी वनविभागाच्या ताब्यात दिले. पुढील तपास चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी उद्धव नैताम, किशोर देऊळकर, मधुकर राठोड करीत आहेत.