सभेतील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी ७५ हजार केले लंपास
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
✍8554920002🪀
वाशिम येथे आज दि. २३ ऑगस्ट रोजी भावना ताई गवळी यांनी आयोजित केलेल्या सभेत मोठा मेळावा झाला. याचा फायदा घेत पाकिटे चोरट्यांनी एकूण ७५ हजारांची रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. वाशिम येथील वाटाणे लॉन येथे झालेल्या वाशिम जिल्हा मेळाव्यात जिल्ह्यातून शिंदे गटाचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. येथे महाराष्ट्र सरकारचे मंत्री, आमदार, खासदार व्यासपीठावर होते. परंतु यादरम्यान वाशिम येथील
शिवाजी चौकातून रॅली व सभेला सुरुवात झाली. खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्याचे १० हजार, पत्रकाराचे १५ हजार, शिवसैनिक पदाधिकारीचे ३५ हजार आणि अन्य एका व्यक्तीचे १५ हजार रुपये चोरट्यांनी लांबवले. त्यामुळे या सर्वांच्या सभेला पोहोचण्याचे मोठे नुकसान झाले असून, सभेच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र गर्दीचा फायदा घेत चोरट्यांना यश आले. यामध्ये एक पत्रकार मंचावर नेत्यांशी बोलत असताना त्याच्या खिशातून १५ हजार रुपये उडवले.✍