बहिणाई ब्रिगेड, अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ आणि साहित्यप्रेमीं तर्फे कवयित्री बहिणाबाई उद्यान जळगाव येथे निसर्ग कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
जळगांव प्रतिनिधी :खंडू महाले मो.7796296480
सूक्ष्म निरीक्षणशक्ती, आचंबित करणारी प्रतिभा, जीवनाकडे बघण्याची सकारत्मक दृष्टी, सुलभ सोप्या गणबोली भाषेतून जीवनाचे सार कवितेतून मांडण्याची अचाट बुद्धिमत्ता आणि चालतं बोलतं विद्यापीठ असणाऱ्या खान्देशभुषण कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणजे कवितांमधून जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या महान कवयित्री होय. त्या माऊलीच्या चरणी आमचा विनम्र प्रणाम🙏🏻🙏🏻🙏🏻माजी महापौर मा. सिमाताई भोळे आणि प्रथम महापौर तसेच बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा मा. आशाताई कोल्हे, अ.भा.लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रदीप (बंडु) भोळे, बहिणाई ब्रिगेडच्या उपप्रदेशाध्यक्ष हर्षाताई बोरोले, मा.नगरसेवक विरेनदादा खडके, बहिणाबाई ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सौ सुनिताताई येवले, जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे, महानगराध्यक्ष योगेश काळे यांनी पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. लेवा गणबोली मंडळाचे सचिव व कलावंत मा.तुषार वाघुळदे यांनी कायक्रमाचे प्रास्ताविक केले. श्री.बंडुदादा भोळे व सौ सुनिता येवले यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यिक कार्याला उजाळा देण्यात आला. मा.आमदार साहेब श्री राजूमामा भोळे यांनी अवघ्या १० – १२ दिवसात महापालीकेच्या उद्यानातील पुतळ्याचे सुशोभिकरण, पुतळ्यावर आकर्षक छत्र, मार्बल व ग्रॅनाईटचा चौथारा, गंज लागून खराब होवू नये म्हणून स्टीलचे सुंदर रेलींग व पायऱ्या, मोहक नेमप्लेट इ काम आम्हा सर्वांच्या विनंती पर मागणीनुसार अत्यंत्य उत्कृष्ठरित्या पूर्ण करून दिले , ते ही स्वखर्चाने ….! त्याबद्दल सर्व रसिकांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करून मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. मा. आमदार साहेब अधिवेशना निमित्त मुंबई येथे असले तरी मा. सिमाताई व मा. विरेनदादा यांच्या मार्गदशनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले. त्याप्रित्यर्थ मंडळाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने मा. सिमाताई भोळे व मा. विरेनदादा यांचा सत्कार ही करण्यात आला. बहिणाई ब्रिगेडच्या महानगराध्यक्षा साधनाताई लोखडें यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रसंगी प्रदेशसदसय निखिल रडे,महानगर कार्याध्यक्ष सागर महाजन, योगेशभाऊ काळे, सुरेश फालक, धिरज पाटील, गणेश काळे व बहिणाई ब्रिगेडच्या पुष्पाताई पाटील , कांचनताई आटाळे तसेच युवक महासंघाचे इतर पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.