नगर पंचायत मानोरा मध्ये विकास कामे रखडली
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय उत्तम पडघान✍
🪀8554920002🪀
वाशिम / मानोरा
नगर पंचायत मानोरा येथे गेल्या काही दिवसांपासून बांधकाम अभियंता नसल्याने अनेक विकास कामे खोळंबली आहे. येथे तात्काळ पद भरावे, अशी मागणी नगरसेवक रुपेश पारडे यांनी केली आहे. अमित घुले यांची अतिरिक्त अभियंता बांधकाम म्हणून दिवस आठवड्यातील दोन ( मंगळवार, गुरुवार) नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र आतापर्यंत ते रुजूझाले नाही. त्या मुळे बांधकामाना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी न मिळता पायाभूत सुविधा, निविदा प्रक्रिया आदी कामे होत नाही. परिणामी विकास खोळंबला आहे. जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन येथे तात्काळ बांधकाम अभियंता द्यावा, अशी मागणी नगरसेवक रुपेश पारडे यांनी केली आहे. याबाबत नगर पंचायतचे मुख्याधिकारी यांना विचारले असता वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगितले.✍