श्रावण सरी आल्या सरसर | अंगाला तो गारवा शिवते

ओलेचिंब होताना पाहून | मज ते गीत आठवते

श्रावण महिना असतोच तसा सर्वांना हवाहवासा वाटणारा तसंच मन मोहून टाकणारा… म्हणजेच या महिन्यात काही‌तरी विशेषतः असेलच नाही‌ का ..? श्रावणातल्या त्या सरी सतधार पडत असतात तिकडे, तिकडे गर्द हिरवा रंग पसरलेला दिसतो, नद्या, नाले तुडूंब भरलेले दिसून येतात त्यांचे खरे रूप तर. ..तेव्हाच बघायला मिळत असते. काळेकुट्ट रूप त्या डोंगर दादाचे अन् त्यातून निघणारी पांढरी शुभ्र वाफ अगदी एकटक बघायला भाग पाडते. या श्रावणात येणाऱ्या पावसाच्या सरी कोणाला बरं आवडणार नाही. ..? त्या सतधार पडणारा ऱ्या त्या सरी पाहून पशू, पक्षी, वेल्या, झाडे,रंगीबेरंगी फूले आणि पक्षांचे मंजूळ आवाज आणि त्यांचा किलबिलाट जणू देखणेच अगदी निसर्गाची देणचं म्हणावे लागेल त्या श्रावणातील सरी वरचेवर पडत असतात मग हळूच जेव्हा, वारा येतो तेव्हा, तो गार वारा अगदी अंगाला शिवून जातो. मन अगदी प्रफुलित होऊन जातं ऐन त्याच वेळी ओठात सहजपणे एखाद्या सुंदर ओळी आपोआप येतच असतात.

श्रावणातल्या सरीने भिजले माझे अंग
मन मोहून टाकले ते फुलांचे रंग
श्रावणातील ते गोड गाणे ओठावर आले
ढगाळलेल्या त्या गगणाकडे मी विजांना पाहिले.

या निसर्गाचे धन्यवाद मानावे खरंच तेवढे थोडेच आहे. त्याने प्रत्येक वस्तूंची निर्मितीच अशी केलेली आहे की, सर्वांना शिकायला भाग पाडणारी व आनंद देणारी श्रावण महिन्यातील सरींसोबत फूले सुद्धा बोलू लागतात,त्या सरींवर त्यांचे प्रेमच असते म्हणून ते प्रसन्न दिसत असतात. कधी न कोणाशी बोलणारे तेही श्रावण सरींसोबत बोलत असतात मग एखादा कवी कसा बरं मागे राहील. .. ? नक्की च एक तरी कविता श्रावण सरीवर तो लिहिणारच कारण कवीला अनेक असे सुंदर शब्द सुचत असतात तर ..कधी कल्पना करून सुद्धा लिखाण करत असतो. तसाच तो, त्या श्रावणातल्या सरींकडे बघून अंगाला शिवून जाणाऱ्या गारव्यावर प्रभावी व सर्वांना वाचायला भाग पाडणारा ऱ्या कविता लिहीत असतो.त्या रचनेशी एकरूप होऊन जातो कदाचित येणाऱ्या या श्रावणातील सरीकडून खूप काही शिकण्यासारखे आहे बरं..! श्रावणातील सरी येतात पण,खूप काही देऊन जातात स्वतः ही आनंदीत राहतात या भल्या मोठया निसर्गाला सुद्धा मोहात पाडतात.जणू त्या सर्वाच्याच होऊन जातात, हव्याहव्याशा वाटतात त्या कधी जाऊच नये अशा वाटत असतात.
येणारा थंडगार गारवा जेव्हा, अंगाला शिवते तेव्हा मन अगदी आनंदीत होऊन जातं नव, नवीन कल्पना सुचतात असा तो थंडगार गारवा हवाहवासा वाटतो, आणि त्या पडणाऱ्या सरी ओंजळीत धरून वरचेवर झेलावं वाटतं, त्यांचा मोह आवरत नाही त्या सरी, सरसर पडत असतांना नुसते अंगावर घ्यावे वाटत असतं कदाचित हे श्रावण सरींवर असणारे प्रेमच म्हणावे लागेल म्हणूनच त्या सर्वाना भुलवून टाकतात.

श्रावण सरी येती अन् जाती
निसर्गही बदलून जातो
भुलून गेले त्याच्यात सारे
असा हा श्रावण महिना येतो

सौ.संगीता संतोष ठलाल
मु.कुरखेडा जि.गडचिरोली
७८२१८१६४८५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here