सरपंच महेश व ज्योत्स्ना विरले नक्की करतात तरी काय ❓

सरपंच महेश व ज्योत्स्ना विरले नक्की करतात तरी काय ❓

कोकणातील बसचा परतीचा प्रवास स्वखर्चाने”

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333

दि. 24 कार्यसम्राट ही पदवी ग्रामस्थांकडून भूषविलेले सरपंच महेश विरले व सामाजिक कार्यकर्ता जोस्त्नाताई महेश विरले आज खरोखरच इतिहासात जे घडलं नाही ते त्यांनी करून दाखवलं आहे.

याआधी कोकणात जाण्यासाठी कोणतीही बस सुविधा कर्जत किव्हा नेरळ येथूनं नव्हती ती आज रोजी कोल्हारे गावाचे सरपंच महेश विरले व सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्स्ना महेश विरले यांनी केली आहे.

गणपती उत्सवासाठी गणेश भक्त कोकणात नेहमीच जातात. परंतु त्यांना कल्याण,पनवेल, मुंबई, ठाणे येथून कोकणात जाण्यासाठी प्रचंड ताण तणाव सहन करावा लागत असे. स्थानिकांनी ही अडचण जोस्त्ना विरले व महेश विरले यांना सांगितली व त्यांनी बस सेवा उपलब्ध करुन दिली.

विरले दांपत्यांकडून ही बस सेवा नेरळ- कोल्हारे येथून पहिल्यांदाच सुरू केल्यामुळे नेरळ येथील गणेश भक्त अत्यंत आनंदी आहेत.

विशेष म्हणजे ही बस सेवा त्यांनी सुरू केल्याने व परतीचा संपूर्ण बसचा प्रवास खर्च स्वखर्चाने केल्याने गणेश भक्तांना अतिशय आनंद झाला आहे.

ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध यांना प्रवास करताना त्रास होऊ नये ही संकल्पना मनाशी बांधून त्यांनी ही बस सेवा सुरू केल्याचं याप्रसंगी त्यांनी सांगितले

तर अशी सेवा त्यांनी उत्तरोत्तर करावी अशी नागरिकांनी अशा व्यक्त करून कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य व विरले कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले.

याप्रसंगी कोलारे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य, गणेश भक्त, प्रवासी व नागरिक उपस्थित होते.