गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी जिल्ह्यात 10 ठिकाणी जनसुविधा केंद्र
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- कोकणात गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुखकर व सोपा व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गावर विविध सोयी-सुविधांनी युक्त अशी जनसुविधा केंद्रे उभारली आहेत. या केंद्रांमुळे भक्तांना प्रवासात कोठेही अडचण येणार नाही.
जिल्ह्यात एकूण १० ठिकाणी सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली असून, पळस्पे फाटा, खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड शहर आणि पोलादपूर (लोहारे) येथे ही केंद्रे कार्यरत असणार आहेत.
या जनसुविधा केंद्रांवर पोलीस मदत केंद्र व आपत्कालीन पोलीस मदत टोईंग व्हॅन, क्रेन,वाहन दुरुस्ती कक्ष, टायरमध्ये हवा भरण्याची सोय,
वैद्यकीय कक्ष, अॅम्ब्युलन्स सेवा व मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार,बालक आहार कक्ष व महिलांसाठी फिडींग कक्ष,
मोफत चहा, बिस्कीट, पाणी व ओ.आर.एस. इत्यादी मिळणार आहेत.