महाराष्ट्र हादरला: डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 नराधमांनी केला बलात्कार.

45

महाराष्ट्र हादरला: डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 नराधमांनी केला बलात्कार.

महाराष्ट्र हादरला: डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 नराधमांनी केला बलात्कार.
महाराष्ट्र हादरला: डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर 29 नराधमांनी केला बलात्कार.

=== मुख्य मुद्दे ===
● 29 नराधामानी केला वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार.
● प्रियकर ठरला नराधम.
● महिला सुरक्षाचे धिंडवळे.

✒ …………… ✒
मुंबई महानगर प्रतिनिधी

मुंबई :- महाराष्ट्राला हादरवणारे साकीनाका बलात्कार प्रकरण ताजे असतांना आता डोंबिवलीतुन एक संतापजनक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या उपनगर डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 29 नराधमांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात सध्या महिला अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे माघील अनेक घटनेवरुन दिसून येत आहे. आज लहान मुली पासुन ते महिले पर्यंत सुरक्षाचे धिंडवने निघत आहे. आज कुठेच महिला आणि मुलीमध्ये भयाचे वातावरण दिसून येत आहे.

प्रगतशील मुंबईच्या डोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन अल्पवयीन मुलांसह 23 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आरोपींमध्ये काही राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येत आहे.

प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित अल्पवयीन मुलिवर बलात्कार करत व्हिडियो बनवला होता. व्हिडिओला समाज माध्यमात वायरल करण्याची धमकी देत पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी बलात्कार केल्याची माहिती सध्या समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु केला असून आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी झाला बलात्कार.

जानेवारी महिन्यात पीडित अल्पवयीन मुलीवर तिच्या प्रियकराने बलात्कार करत तिचा व्हिडियो काढला होता. हा व्हिडियो या तरुणाने आपल्या मित्रांना दाखवला. या व्हिडियोच्या आधारे आतापर्यंत 29 जणांनी या पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले. बदलापूर, रबाळे, मुरबाड आणि डोंबिवलीत वेगवेगल्या ठिकाणी तिला घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला गेला. मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामध्ये दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत. 21 आरोपींच्या अटकेनंतर पोलीस सहा आरोपींच्या शोधात आहेत.