ब्रम्हपुरी येथे सर्व पक्षीय व विविध जन संघटनेच्या वतीने बैठक संपन्न
27 सप्टेंबर भारत बंद निमित्त.ब्रम्हपुरी येथे विराट बैलबंडी ट्रॅक्टर मोर्चा काढण्या चा निर्णय.

27 सप्टेंबर भारत बंद निमित्त.ब्रम्हपुरी येथे विराट बैलबंडी ट्रॅक्टर मोर्चा काढण्या चा निर्णय.
✒अमोल माकोडे✒
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
ब्रम्हपुरी:- गेल्या 9 महिन्या पासून शेतकरी विरोधातील तीन काळे कायदे रद्द करा.एम.एस.पी. चा कायदा करा.वीज विद्युत विधेयक 2020 रद्द करा या मागणीसाठी दिल्ली येथे शेतकरी आंदोलन सुरू आहे.जवळपास 400 शेतकरी या आंदोलनात शहीद झाले.परंतु केंद्र सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही.तेव्हा सदर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने 27 सप्टेंबर 2021 रोजी भारत बंद ची घोषणा केली आहे तेव्हा सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी ब्रम्हपुरी येथील गंगाबाई तलमले कॉलेज मध्ये 23 सप्टेंबर रोजी मा.प्रभाकर सेलोकर काँग्रेस चे तालुका कार्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय व विविध जन संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.विनोद झोडगे,शेतकरी नेते तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ऍड गोविंद भेंडारकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष वासू सौंदरकर,विधान सभा प्रमुख जगदीश पिलारे,शिवसेना तालुका अध्यक्ष नरू नरड, शहर प्रमुख किशोर चौधरी,संजय मगर बी. आर.एस.पी.महासचिव,विधान सभा प्रमुख गोपाल मेंढे,तालुका अध्यक्ष मार्कांड बावणे,रोशन मेंढे बी. आर.वी.एम., अँड हेमंत उरकुडे प्रहार तालुका अध्यक्ष,सचिन मंडपे, ड्रा.जयप्रकाश धोंगडे समता सैनिक दल संघटन सचिव, प्रा.राकेश तलमले ओ.बी.सी.संघटना,राहुल भोयर राष्ट्रवादी काँग्रेस,राजेश माटे,बापूजी भरडकर, उतमराव ढोंनगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यामधे सर्वांनी आपले विचार व्यक्त करून 27 सप्टेंबर भारत बंद निमित्त संपूर्ण ब्रम्हपुरी शहरासह ग्रामीण भागात सुद्धा कडकडीत बंद पाळून सकाळी 11 वाजता हुतात्मा स्मारक येथून विशाल बैल बंडी,टॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा सर्वानु मते ठरविण्यात आले आहे.या भारत बंद आंदोलन मध्ये शेतकऱ्यानं सह ईतर जनतेनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी विविध पक्ष व सामाजिक जन संघटनेची विस्तारित बैठक 25 सप्टेंबर रोजी रात्रौ 7.00 वाजता गंगाबाई तलमले कॉलेज येथे आयोजित केली होती.