धनोजे कुणबी समाज सावनेरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार कार्यक्रम संपन्न.

43

धनोजे कुणबी समाज सावनेरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार कार्यक्रम संपन्न.

धनोजे कुणबी समाज सावनेरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार कार्यक्रम संपन्न.
धनोजे कुणबी समाज सावनेरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार कार्यक्रम संपन्न.

वाघोडा/सावनेर-18 सप्टेंबर 2021
सावनेर येथे धनोजे कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,दि.18 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता वानखेडे सभागृह,पांढूर्णा रोड सावनेर येथे वर्ग 10 वी आणि 12 वी मधे 80% पेक्षा अधिक, पदविका/पदवी/पदव्युत्तर मधे 70% पेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला.तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसोबत आदर्श शिक्षकांचा सुद्धा शाल,श्रीफळ,मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.मंचकावर अध्यक्षस्थान डॉ.गंगाधर बोबडे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.अध्यक्ष मनोहर कुंभारे,सावनेर तालुका अध्यक्ष सोनबाजी मुसळे,श्री.गंगाधरजी माडेकर नगराध्यक्ष रेखा मोवाडे,नगरसेवक अविनाश उर्फ पप्पू झाडे,अध्यक्ष नागपूर जिल्हा विकास आघाडी रामराव मोवाडे, माजी नगरसेवक राजू घूगल,डॉ. परेश पिंगे,डॉ.दोरखंडे,गणराजजी मोहितकर,व शंकर ढोके उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी धनोजे कुणबी समाजाच्या युवक-युवतींनी समाज जागृती करिता समोर यावे व एकजुटता दाखवावी.तसेच अध्यशिय भाषणात डॉ.गंगाधर बोबडे यांनी आश्वासन दिले कि 2 ते 3 महिन्यामध्ये सावनेर येथे समाज भवनाच्या कामाचा शुभारंभ करण्याचा.
कार्यक्रमाचे संचालन श्री.अजयजी मोवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.किशोरजी मुसळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सावनेर शहर व ग्रामीण मधील समाजबांधव मा.श्री.पुंडलिकजी बोंडे,श्री.अतुल लांबट,मयूर जोगी, धनंजय मोवाडे,राजेंद्र बोढे,तुकाराम ताजणे,राजेंद्र ढोके,गणेश ढोके,अनिल बोरकडे,डॉ.रुपेश खुसपरे,संजय ढोके,व इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.