मातोश्री महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान
राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
मातोश्री आशाताई कुणावार कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन गुणवंत विद्यार्थिनींच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ उमेश तुळसकर तर अतिथी म्हणून प्रा डॉ नयना शिरभाते, उपप्राचार्य, विद्या विकास महाविद्यालय, समुद्रपुर, यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली, प्रसंगी कला वाणिज्य व विज्ञान विभागाच्या अनुक्रमे पायल वावरे, बतुल दरबार व मिनाक्षी जयस्वाल या विद्यार्थिनींचा गुणवंत विद्यार्थिनी म्हणून सन्मान करण्यात आला,महाविद्यालयातील सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल प्रा. किरण हुरकट, ग्रंथपाल डॉ. सुनंदा गिरडे यांचे अभिनंदन करण्यात आले व नुकत्याच पार पडलेल्या पेट परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा. वैशाली तडस, प्रा. प्रणिता आष्टणकर, प्रा. प्रीती दुबे यांचेही अभिनंदन करण्यात आले, कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ नयना शिरभाते यांना प्लांट कल्टीवेशन या विषयांतर्गत आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, प्रसंगी त्यांनी सत्काराला उत्तर देताना सर्वांचे आभार मानून या संशोधनाच्या प्रवासातील अनुभव कथन केले व पुढील काळात या संशोधनाचा कसा फायदा होईल हे स्पष्ट केले, अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ उमेश तुळसकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवून राष्ट्रीय सेवा योजना सर्वांच्या व्यक्तिमत्त्व विकासास कशी फायदेशीर आहे याबद्दल भाष्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा अभय दांडेकर यांनी तर संचालन प्रा प्रणिता आष्टनकर व रश्मी चंदनखेडे यांनी केले तर आभार प्रा सपना जयस्वाल यांनी मानले
कार्यक्रमाला कला वाणिज्य व विज्ञान विभागाचे सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती, आयोजनासाठी सर्व स्वयंसेविका यांनी सहकार्य केले, प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.