जुनी पेन्शन योजना लागु करणे साठी तळा तालुक्यात आज बाईक रॅलीचे आयोजन-भुषण विश्वासराव पाटील
✍️सचिन पवार ✍️
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
तला :-सन 2005 नंतर शासन सेवत रुजू झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांना नविन पेन्शन योजना लागू करण्यात आली असून सदरची पेन्शन योजना ही अन्याय कारक असून जूनी पेन्शन योजना पुर्ववत करणेसाठी संपुर्ण महाराष्ट्रात आज दिनांक 21/09/2022 रोजी शासकीय कर्मचारी यांना महाराष्ट् राज्य मध्यर्वती कर्मचारी संघटनेच्या आदेशाने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होत.
सदर आंदोलनात तळा तालुक्यातील महसूल, वन व इतर सर्वच शासकीय विभाचे कर्मचारी यांनी श्री.भुषण विश्वासराव पाटील, अध्यक्ष तळा तालुका तथा सरचिटणी रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटना यांचे नेतृत्वामध्ये तळा तहसिलदार कार्यालय ते तळा शहर बळीचानाका व तहसिलदार कार्यालय तळा अशा मार्गाने आपल्या न्याय हक्का साठी बाईल रॅली काढली व शांत मार्गाने तसेच सविनधानीक तहसिलदार कार्यालयाच्या मैदानात मार्गाने घोषणा वाजी करत मा.तहसिलदार तळा हयांना निवेदन दिले. सदर वेळी बोलतांना श्री.भुषण पाटील यांनी PFRDA कायदा तातडीने रद्द करुन सन 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या सर्वच शासकीय / निमशासकीय कर्मचारी यांना जूनी पेन्शन योजना लागू करणे बाबत मागणी केली तसेच इतर अनेक मागण्या ज्या शासन दरबारी प्रलंबित आहेत त्यांचा निमटारा राज्य सरकारने तातडीने करणे बाबत देखील मागणी .