सिलेंडरमधून गॅस गळती होऊन चार कामगार भाजले, वेकोलिच्या घुग्गुस सीएचपीमधील घटना

अश्विन गोडबोले

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

मो: 8830857351

घुग्घुस, 23 सप्टेंबर: वेकोलिच्या सीएचपी (कोल हँडलिंग प्लांट) मध्ये हायड्रोनोम्याटिक सिलेंडरचे सील लीक झाल्याने गॅस गळती होऊन चार कामगार भाजले. ही घटना शनिवार, 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास घडली.  

घुग्घुस येथील वेकोलिच्या सीएचपी (कोल हँडलिंग प्लांट) मध्ये हायड्रोनोम्याटिक सिलेंडरचे सील कटल्यामुळे कॉम्प्रेस्ड गॅस मोठ्या दबावाने बाहेर निघाली. यावेळी तेथे काम करीत असेलेल मारोती वनकर, विलास झाडे, रेखचंद्र ताजने व प्रभानंद कटकुरवार हे चार कामगार भाजले. त्यांना वेकोलिच्या राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली जखमी कामगारांवर राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात उपचार सुरु होता.

याबाबत कळताच भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, सिनू इसारप, संजय जोगी, तुलसीदास ढवस, कामगार नेते सचिन कोंडावार यांनी राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात जाऊन जखमी कामगारांची भेट घेऊन विचारपूस केली व घटनास्थळाची पाहणी केली. ठाणेदार आसिफराजा शेख यांनी पोलिस पथकासह घटनास्थळाची पाहणी केली व जखमी कामगारांचे बयान नोंदविले. सीएचपी बँकर बंद झाल्याने कोळसा वाहतूक करणार्‍यांच्या ट्रकांच्या परिसरात रांगा लागल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here