यावल तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कागदपत्रांच्या आढाव्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ‘खुश’

 

सुपडू संदानशिव

यावल तालुका प्रतिनिधी

📱9561200938

यावल – तालुक्यातील अधिकारी प्रशासकीय गतिमानतेच्या ध्येय व उद्दिष्टानुसार तसेच शासनाच्या निकषानुसार शंभर टक्के कर्तव्य पालन करता आहेत याचा मला आनंद आणि खुशी आहे अशी आढावा बैठकीची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकारांना दिली.बंद खोलीत झालेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील अधिकाऱ्यांनी कार्यालयात तयार केलेले कागदपत्रे,अहवाल लक्षात घेता आणि तालुक्यात निघालेले विविध मोर्चे,झालेले आंदोलन, उपोषण,प्राप्त तक्रारी, प्रत्यक्षात असलेल्या समस्यांचे चौकशीचे पुढे काय झाले..? आणि काय होणार..? इत्यादी अनेक प्रश्न तालुक्यातील जनतेमध्ये उपस्थित केले जात आहेत.

शुक्रवार दि.२२ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास यावल तहसील कार्यालयात तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाची आढावा बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली.बैठकीत पत्रकारांना परवानगी नसल्याने बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांना माहिती दिली त्यांनी लागोपाठ नॉन स्टॉप दहा ते पंधरा मिनिट पत्रकारांना माहिती दिली.त्यात महत्त्वाचे म्हणजे तालुक्यात ६५ टक्के पिक पाहणी झाली, तालुक्यात ६२ मुले कुपोषित आहेत,याकडे आरोग्य विभाग लक्ष देणार आहे,तालुक्यात एकूण ८ ठिकाणी अंगणवाड्यांची मागणी आहे, ५ जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्युत कनेक्शन देण्याबाबत वीज वितरण कंपनीला सूचना देण्यात आल्या,तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामांवर गटविकास अधिकारी,यावल तहसीलदार यांनी वेळोवेळी साइडवर जाऊन व्हीजीट दिल्या आहेत. तालुक्यात २ गावांमध्ये रोजगार हमीची कामे झालेली नाही, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत साठी शासन दरबारी प्रयत्न करणार,टीपीडीसी अंतर्गत१०० टक्के प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे,थकबाकी, वसुली बाबत, ग्रामरोजगार सेवकांबाबत,दलित,शबरी, रमाई घरकुल योजनेबाबत तसेच आयुष्यमान भारत कार्ड तालुक्यात ३२ हजार वाटप करण्यात आले अजून ८४ हजार वाटप करण्याच्या सूचना केल्या.

यानंतर तहसील कार्यालयात पत्रकारांचे जास्त प्रश्न ऐकून न घेता यावल नगरपालिकेजवळ राजे निंबाळकर यांचा इतिहासिक किल्ला पाहणी केल्यानंतर यावल नगरपालिका कामकाजाचा आढावा घेत, कामकाजा विषयी समाधान व्यक्त करून काही सूचना दिल्या.

यावल तालुक्यात अनेक शासकीय कार्यालयाच्या कामकाजाविषयी कामाच्या गुणवत्तेविषयी तालुक्यातील जनतेच्या लेखी तक्रारी,सूचना आहेत आणि यासाठी वेळोवेळी अनेक संघटना कार्यकर्त्यांनी,राजकीय पक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आंदोलन, रस्ता रोको,मोर्चे उपोषण करून विविध समस्यां प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत, त्यांना आश्वासन सुद्धा देण्यात आले आहे त्या सर्व समस्यांचे प्रश्नांच्या चौकशीची काय झाले..? आणि काय होणार…? याबाबत मात्र आता तालुक्यातील जनतेमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here