माहुर पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याची मागणी…

गोपाल नाईक

नांदेड जिल्हा प्रतिनिधी

मो: 7499854591

नांदेड : जिल्ह्यातील माहुर शहरासह तालुक्यातील अनेक गावामध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरू झाला असून सभ्य नागरीकांना याचा हकनाक त्रास सहन करावा लागत आहे.परिसरात अवैध दारु विक्री,मटका व गुटख्याची सरास विक्री सुरु असल्याचे अनेक नागरीकांकडून बोलल्या जात आहे.अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जात आहे.त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होण्याचे मार्गावर आहेत.बायका पोरांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

     एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍याची वाताहात झाली आहे.शेतकरी पुरता हातगाईला आला आहे.वैफल्याने ग्रासला आहे.अशा परिस्थितीत नशेच्या आहारी जाणे स्वाभाविक आहे.परंतुृ यामुळे संसाराची धुळधान होत आहे.तसेच जास्त पैसे मिळण्याच्या प्रलोभनामुळे अनेकजण मटक्याच्या आहारी गेल्याचे आढळून आले आहे.ग्रामीण भागापर्यंत मटका या जुगाराचे जाळे पसरले आहे.मटक्याच्या आहारी गेल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच या सर्व प्रकारामुळे सामान्य जनता मात्र हैराण झाली आहे.खेड्या पाड्यातील मिसरुड फुटलेली मुले या प्रलोभनाला बळी पडत आहेत.शिक्षण घेण्याच्या वयात मुले अनेकप्रकारचे व्यसनं करु लागली आहेत.ही बाब अत्यांत धोकादायक असून या प्रकाराला कोण खत पाणी घालत आहे.याचाही शोध घेणे गरजेचे आहे.

भविष्यातील हा धोका ओळखून भाजपा आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष प.पूज्य योगी श्याम बापू भारती महाराज यांच्या नेतृत्वात सुदर्शन नाईक शिवसेना तालुका प्रमुख,महाराष्ट्र मिडिया मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष वसंत कपाटे,द.पाॅवर ऑफ मिडियाचे तालुका अध्यक्ष विजय आमले यांच्या शिष्ट मंडळाने नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन या सर्व समस्येवर सविस्तर चर्चा करुण माहुर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याची मागणी प्राधान्याने केली आहे.तसेच हे धंदे बंद न झाल्यास तिव्र अंदोलन छेडण्याचा इशाराही संबधिताना या निवेदनाच्या वेळी देण्यात आला आहे.तातडीने या समस्येवर तोडगा काढण्याचे आस्वासन पोलिस अधिक्षक यांनी दिल्याचे सांगितले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here