जिल्हास्तरीय शालेय रोप मल्लखांब स्पर्धेत किनगांव इंग्लिश मिडीयम स्कुलच्या यश,विभागीय स्पर्धेसाठी निवड


सुपडू संदानशिव

यावल तालुका प्रतिनीधी

📱9561200938📱

जिल्हास्तरीय शालेय रोप मल्लखांब स्पर्धा शुक्रवार दि.२२ रोजी रायसोनी स्कूलमध्ये घेण्यात आल्या या स्पर्धेत किनगाव येथील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलच्या १४,१७ व १९ वयोगटातील विद्यार्थीनींनी उत्कृष्ठ प्रदर्शन करत विजय संपादन केले व विभागीय शालेय रोप मल्लखांब स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले यात १४ वर्षाआतील वयोगटात दिव्या मेलासिंग बारेला (तृतीय) व

अश्विनी शशिकांत बारेला (चतुर्थ) १७ वर्षाआतील वयोगटात पल्लवी सुरसिंग बारेला (प्रथम) स्नेहल पिंटू पावरा (तृतीय) तर

रंगीता राहुल बारेला (चतुर्थ)१९ वर्षाआतील वयोगटात मनिषा प्रेमसिंग बारेला (द्वितीय) व

एंजल तानसिंग बारेला (चतुर्थ) यांनी यश संपादन केले या खेळाडूंना पुजा शिराेडे मँडम काेच नरेंद्र भाेई व इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगावचे क्रिडा शिक्षक व यावल तालुका क्रिडा समन्वयक दिलीप बिहारी संगेले यांचे मार्गदर्शन लाभले.विजयी सर्व खेळाडुंचे इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील व्हा.चेअरमन सौ.शैलेजाताई विजयकुमार पाटील सचिव मनिष विजकुमार पाटील व्यवस्थापक सौ.पुनम मनिष पाटील प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील उप प्राचार्य सौ.राजश्री सुभाष अहिरराव इ.सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 जिल्हास्तरीय शालेय रोप मल्लखांब स्पर्धेत किनगाव इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थीनींचे यश.विभागीय स्पर्धेसाठी निवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here