महिला उद्योजकांचे ‘आई’ कडे दुर्लक्ष

81
महिला उद्योजकांचे 'आई' कडे दुर्लक्ष

महिला उद्योजकांचे ‘आई’ कडे दुर्लक्ष

महिला उद्योजकांचे 'आई' कडे दुर्लक्ष

व्यवसाय वाढविण्या साठी योजना; १५लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५८९३
अलिबाग: राज्य सरकारचे महिला केंद्रीत पर्यटन धोरण जाहीर झाले. यामध्ये ‘आई’ ही विशेष योजना जाहीर करून त्याला चार महिन्याचा कालावधी उलटला; मात्र कोकण विभागातून योजनेसाठी फारच कमी प्रस्ताव सादर झाले आहेत.

कोकण किनारी पट्टी लगतच्या गावात खानावळ, न्याहरी-निवास यासारखे पर्यटनाशी संबंधित व्यवसाय विकसित होत आहेत. मात्र आई योजनेची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यात न आल्याने अनेक जण अनभिज्ञ आहेत. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता व नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी आई या योजनेची निर्मिती केली आहे.
पर्यटन संचालनालया कडे संबंधित व्यवसायाची नोंदणी असली पाहिजे. व्यवसाय महिलांच्या मालकीचा, त्या चालवत असल्या पाहिजे, पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले ४१ प्रकारचे व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी पर्यटन विभाग महिलांना १५ लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे.
योजनेची जनजागृती न झाल्याने व राष्ट्रीयकृत बँकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचली नसल्याची बाब समोर येत आहे. योजनेचे अर्ज कसे आणि कुठे भरायचे याबाबत महिलांना मार्गदर्शनाची गरज आहे.

*महिलेकडेच मालकी हवी*
हॉटेल रेस्टॉरंटची मालकी महिलांच्या असावी ही प्रमुख अट आई योजनेची आहे. शिवाय या व्यवसायातील ५०% व्यवस्थापकीय इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सी मध्ये ५०टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. तसेच व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानगी मिळविणे अपेक्षित आहे.

कोकणातील महिला उद्योजकांसाठी आई योजना खूप चांगली आहे. ज्या महिलांना नव्याने व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा असलेल्या व्यवसाय वाढवायचा आहे. त्यांना पंधरा लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रस्ताव सादर करताना व्याजाची हमी घेऊन बँकेला दिलेली व्याजाची रक्कम ही पर्यटन संचालनालय देईल. या योजनेची जनजागृती केली जात आहे.
— हनुमंत हेडे
उपसंचालक, पर्यटन संचालनालय कोकण विभाग

*योजनेतील महत्त्वाचे मुद्दे*
१)पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले ४१ प्रकारची व्यवसाय उद्योगासाठी कर्ज
२) १२ टक्क्यापर्यंतच्या व्याजाचे हप्ते पर्यटन संचालनालय भरणार
३) व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा
४)टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सी मध्ये ५०टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक
५) अर्जदारानी पर्यटन संचालनाच्या www maharashtratourism.gov in ऑनलाइन अर्ज करावे.