यंदाचा महोत्सव अभूतपूर्व होणार : आ. जोरगेवार

76
यंदाचा महोत्सव अभूतपूर्व होणार : आ. जोरगेवार

यंदाचा महोत्सव अभूतपूर्व होणार : आ. जोरगेवार

यंदाचा महोत्सव अभूतपूर्व होणार : आ. जोरगेवार

• माता भक्त आणि विश्वस्तांची नियोजन बैठक
• 7 ऑक्टोबरपासून पाच दिवसीय महोत्सवाची सुरुवात

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 23 सप्टेंबर
यंदा 7 ऑक्टोबरपासून श्री माता महाकाली महोत्सवाला सुरुवात होणार आहे. याची तयारी आपण सुरू केली असून, महोत्सवाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. यंदाचा महोत्सव अभूतपूर्व होणार असल्याचा विश्वास आ. किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.
7 ऑक्टोबरपासून चंद्रपुरात सुरू होणार्‍या श्री माता महाकाली महोत्सवाच्या नियोजनासाठी महाकाली मंदिरात श्री महाकाली माता ट्रस्टच्या वतीने माता भक्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला श्री महाकाली माता ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील महाकाले, सचिव अजय जयस्वाल, कोषाध्यक्ष पवन सराफ, विश्वस्त श्याम धोपटे, मधुसुदन रुंगठा, वंदना हातगावकर, डॉ. अशोक वासलवार, डॉ. गोपाल मुंधडा, डॉ. जयश्री कापसे-गावंडे, मनिषा पडगीलवार, शैलेंद्र शुक्ला, राजू शास्त्रकार आदींची उपस्थिती होती.
यंदा राज्यस्थानी रथात मातेच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. तसेच पाच दिवस धर्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी चंद्रपुरकरांना अनुभवता येणार आहे. या पाच दिवसात जागतिक दर्जाचे कलाकार आपली कला सादर करणार आहेत. या महोत्सवाच्या नियोजनासाठी महाकाली मंदिरात श्री महाकाली माता ट्रस्ट आणि महाकाली भक्त यांच्यात संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या महोत्सवात 9,999 कन्यांचे कन्याभूजन व कन्याभोजन करण्यात येणार आहे. तसेच नवरात्रीरम्यान जन्मलेल्या कन्यांना श्री महाकाली माता ट्रस्टच्या वतीने चांदीचा शिक्का देण्यात येणार आहे. या भव्य आयोजनात चंद्रपुरकरांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.