15 वर्षांच्या प्रेयसीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला प्रियकराला 10 वर्षांची शिक्षा

20

15 वर्षांच्या प्रेयसीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला प्रियकराला 10 वर्षांची शिक्षा

त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो 9096817953

नागपूर.अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला घरातून पळवून नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाèया प्रियकराविरुद्ध कामठी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात न्यायालयाने आराेपी युवकाला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठाेठावली. हा आदेश अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एम.मिश्रा यांनी दिला. शेरू उफर् साेनू कुरेशी शकूर कुरेशी (वय 20 वर्षे, रा. कटरा, जबलपूर, मध्य प्रदेश, ह.मु. कामठी, कळमणा राेड, नागपूर) असे आराेपीचे नाव आहे.

कामठी sexually assaulting परिसरात 36 वर्षीय महिला आपल्या 15 वर्षीय मुलीसह राहत हाेती. ती शेतीचे काम करुन उदरनिर्वाह करीत हाेती. मुलगा दहाव्या वर्गात शिकत हाेती. तिच्या वस्तीत राहणारा आराेपी शेरू कुरेशी हा भंगार विक्रेत्याशी त्या मुलीची ओळख झाली. दाेघांची काही दिवसांत मैत्री झाली. त्यानंतर आई घरी नसताना ताे वारंवार घरी यायला लागला. शेरुने तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पळून जाऊन प्रेमविवाह करण्याच्या उद्देशाने 23 एप्रिल 2018 राेजी शेरुने त्या मुलीला घरातून पळवून नेले. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन कामठी पाेलिसांनी अपहरण केल्याची तक्रार नाेंदवली. गुन्ह्याचा तपास करताना पाेलिसांनी त्या मुलीचा शाेध घेतला. तिला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तिने आराेप केला की शेरुने बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कुणालाही काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यावरुन पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन तीन महिन्यानंतर शेरुला अटक केली. न्यायालयानेगुन्ह्याचे तपासी sexually assaulting अधिकारी तत्कालीन पाेलिस उपनिरीक्षक सानप यांनी काेर्टात तपासाअंती दाेषाराेपपत्र सादर केले. सदर खटल्यात सरकारी अभियाेक्ता म्हणून अ‍ॅड.साेनाली राऊत यांनी तर, आराेपीर्ते अ‍ॅड.पी.आर. भूरे यांनी काम पाहिले. सदर गुन्ह्यात काेर्ट पैरवी अधिकारी पाेलिस कर्मचारी सुरेश बारसागडे यांनी काम पाहिले.