कालिना विधानसभेतून हजारोंच्या संख्येने रिपब्लिकन जनता होणार सहभागी
मुंबई, २२ संप्टेंबर: भारताच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चा 68 वा वर्धापन दिन येत्या 3 ऑक्टोबर 2025 रोजी ऐतिहासिक महाड क्रांतीभूमीवर जल्लोषात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. नाम. रामदासजी आठवले साहेब प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. देशभरातील रिपब्लिकन जनता, कार्यकर्ते आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने दाखल होणार असल्याने या वर्धापन दिनाचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.
या पार्श्वभूमीवर कालिना विधानसभेमधून महाडकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे. आज आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत महिला आघाडी, रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी संघटना, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या बैठकीतून कालिना विधानसभेतून किमान पाच बस, अनेक फोर व्हीलर गाड्या तसेच ढोल-ताशांचा बंदोबस्त करून कार्यकर्त्यांना महाड येथे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवसभर पाऊस सुरू असूनही बैठकीला कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
बैठकीचे अध्यक्षस्थान मा. श्रावण मोरे (विधानसभा अध्यक्ष) यांनी भूषवले, तर सूत्रसंचालन मा. विजय सकपाळ (विधानसभा सरचिटणीस)यांनी केले. बैठकीचे प्रमुख मार्गदर्शन कामगार नेते तसेच रिपाई जिल्हा अध्यक्ष मा. प्रकाश जाधव साहेब यांनी केले.
विशेष उपस्थितीमध्ये मा. अरुण पवार (संघटक सचिव, मुंबई प्रदेश) मा. शरद मोरे (रिपाई विधानसभा नेते)मा. नितीन कांबळे (कार्याध्यक्ष)मा. सुनील सकपाळ (उपाध्यक्ष) मा. भगवान हाटे (खजिनदार)आदी मान्यवर उपस्थित होते. वार्ड अध्यक्ष म्हणून मा. लखन मगर (89 वॉर्ड), मा. दयानंद सावंत (90 वॉर्ड), मा. दिनेश भाऊ शिंदे (91 वॉर्ड), मा. रुपेश जाधव (167 वॉर्ड) यांनी बैठकीत सहभाग नोंदवला.
महिला आघाडीतून मा. विशाखाताई शिर्के, मा. श्वेता ताई सकपाळ, मा. गीता ताई पवार, मा. ज्योतीताई खरात, मा. राधाताई मगर, मा. रेवतीताई नवगिरे, मा. सविताताई नवघरे व इतर महिलांनी सक्रिय सहभाग घेतला.
रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी संघटनेतून मा. मोहन मंडळ, मा. अर्जुन प्रसाद, मा. अरुण मंडळ, मा. अनिल गुप्ता, मा. शाकीर अन्सारी, मा. रुदलकुमार शाहू उपस्थित होते.युवा आघाडीतून मा. सुनील नवघरे, मा. मिलिंद नवघरे यांनी काम पाहिले.
सदर सभेसाठी अनेक स्थानिक कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये मा. राजेश यादव, मा. राजेंद्र मोहिते, मा. अनिल पवार व अन्य सभासदांनी सहकार्य केले .
महाड क्रांतीभूमीवर होणाऱ्या या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त कालिना विधानसभेमधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून, मोठ्या संख्येने कार्यकर्ते ढोल-ताशांच्या गजरात महाड येथे दाखल होणार असल्याचे निश्चित झाले आहे.