हाथरस घटनेच्या निषेधार्थ समता सैनिक दलाची निदर्शने.

48

हाथरस घटनेच्या निषेधार्थ समता सैनिक दलाची निदर्शने.

प्रतिनिधी

वर्धा:-  उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात मनिषा वाल्मिकी या दलित मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिची जीभ कापून माणेचे हाड मोडून केलेल्या मारहाणीत तीच्या मणक्याला गंभीर दु:खापत झाल्यामुळे शेवटी दवाखान्यात तीचा करून अंत झाला.पोलिसांनी पिडितेचे पार्थिव कुटुंबीयांना देण्याऐवजी परस्पर अंत्यसंस्कार करणे यासारखे दुदैव नाही. ही लोकशाहीची हत्या आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समता सैनिक दल वर्धा युनिटच्या वतीने निदर्शने करण्यात आले. तसेच पिडितेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

समता सैनिक दल जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे, ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश निमसडकर,जिल्हा सह-संघटक स्वप्नील कांबळे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघाचे जिल्हा सचिव प्रदीप भगत,जिल्हा समन्वयक गौतम देशभ्रतार, नारायण मून,दादाराव शंभरकर यांनी श्रद्धांजलीपर विचार व्यक्त केले.

यावेळी जिल्हा संरक्षण विभाग प्रमुख मार्शल प्रदीप भगत,मिलिंद मून, दिनेश वाणी, विनोद जवादे,मधुर येसनकर, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते श्यामराव डहाके, मुख्याध्यापक अनील खडतकर, सुनील बाभळे, अजय गोटे, अजय मून, अरविंद माणिककूळे,सिद्धांत मून,मनोज थुल, अक्षय शेन्डे, शुभम बागडे, सम्यक नगरकर, बिट्टू झामरे, निखिल भगत,अविनाश गायकवाड, सुमित शेंदरे, राजेंद्र कांबळे, विजय उमरे, अमन खोब्रागडे, अमोल ताकसांडे, चंदू भगत, रोशन लोहकरे, आकाश पाझारे, सुरज मोडक,गौतम जुल्मे, हर्षल पाटील, विकास वावरे, राहुल तेलंग, हर्षल करताल,नयन करताल,राहुल उके, सुधीर मोरापे, समीर भस्मे, मोनाल भस्मे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.