वाघाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी* *कुनघाडा रै वनपरिक्षेत्रातील बांधोना जंगल परिसरातील घटना*

45

*वाघाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी*
*कुनघाडा रै वनपरिक्षेत्रातील बांधोना जंगल परिसरातील घटना*

वाघाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी* *कुनघाडा रै वनपरिक्षेत्रातील बांधोना जंगल परिसरातील घटना*
वाघाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी*
*कुनघाडा रै वनपरिक्षेत्रातील बांधोना जंगल परिसरातील घटना*

✒धनराज आर. वैरागडे ✒
9421527972
गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी

*गडचिरोली :* कुनघाडा रै – वनविभाग गडचिरोली, वनपरिक्षेत्र कार्यालय कुनघाडा रै अंतर्गत येणाऱ्या बांधोना जंगल परिसरात पट्टेदार वाघाने झडप घातल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे . ताराबाई नकटु उडाण वय 70 रा इरई कुनघाडा रै असे जखमी महिलेचे नाव असून , सदर घटना 23 ऑक्टोबर रोजी दु 2.30 वाजता घडली
जखमी ताराबाई नकटु उडाण ही स्वतःचे पती व गावातील काही लोकांसोबत धानपिक बांधण्यासाठी लागणारी शिंद कापण्यासाठी जंगलात गेली होती , शिंद कापून झाल्यानंतर परतीच्या वाटेवर असतांना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने पाठीमागून झडप घालून मानेला पकडले.मात्र मानेवर शिदींची पेंढी असल्यामुळे मान वाघाच्या जबड्यात सापडली नाही , त्यानंतर वाघाने महिलेस खाली पाडले व तिच्या मांडीचा मास काढला.व शरीराच्या इतर भागावर तीक्ष्ण जखमा केल्या, घडत असलेली ताजी घटना समोर जात असलेले तिचे पती व इतर लोकांच्या निदर्शनास येताच लोकांनी आरडा ओरड केली तेव्हा घटना स्थळावरून वाघाने पळ काढला . मात्र महिला गंभीर जखमी झाली आहे , महिलेवर कुनघाडा रै येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार करण्यात येऊन , पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे . घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला यावेळी क्षेत्र सहायक एस एम मडावी, वनरक्षक देवेंद्र वासेकर, अमिष खोब्रागडे, रामचंद्र कुनघाडकर व वनपरिक्षेत्रातील इतर कर्मचारी उपस्थित होते पुढील तपास वनपाल एस एम मडावी करीत आहेत . जखीमी महिलेस शासनाकडून आर्थिक सहकार्य मिळावे अशी मागणी जखमी महिलेच्या नातेवाईकांनी वनविभागाला दिलेल्या अर्जातून केली आहे