रोहा तालुक्यातील पाथरशेत गाव मधील मंदिरावरील कळस कोसळला, विज कि वैयक्तिक घटना ग्रामस्थ संभ्रमात
✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞
रोहा :- पाथरशेत गावातील गावापासून ८०० मीटर अंतरावर असणाऱ्या श्री भैरवनाथ मंदिर आहे या मंदिरावर २२ ऑक्टोबर २०२४ च्या मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरावरील कळस कोसळला असुन हा कळस विज पडून पडला कि वैयक्तिक वादामुळे प्रयत्न झाला असल्याचे ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याच रात्री ढगांच्या कडकडासह पाऊस झाला व मंदिरा वीज ही कोसळली असावी असा ही अंदाज वर्तवला जात असुन गावचे पुजारी सकाळी ८ च्या सुमारास पूजेसाठी मंदिरात आले असता त्यांना सगळा झालेला प्रकार दिसला व त्यांनी तात्काळ गावात जाऊन ग्रामस्थांना सांगितले व लगेच कोलाड पोलीस ठाणे येथे सांगितले असता तत्काळ कोलाड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांची टीम पाथरशेत गावात जाऊन मंदिराची पाहणी केली परंतु पाथरशेत पंचक्रोशी यांनी त्याच संध्याकाळी ग्रामसभा घेतली व वीज पडून मंदिराचे नुकसान झाले असेल असे ग्राह्य धरले आहे. मंदिराचे प्रचंड नुकसान झाले आहे. मंदिराच्या वरती तांब्याचे कळस आहे त्याचे चार पाच तुकडे झाले आहेत तर मंदिरातील पत्र्याच्या शेडचे नुकसान तर मंदिरातील सर्व लाईट फिटिंग जळली आहे. तर लाईटचे बोर्ड ही तुटलेले आहेत. ट्यूबलाईट, फॅन ,बाहेरचे हॉलिजन, भरपूर नुकसान झाले आहे ही नैसर्गिक आपत्ती असेल तर शासनाने मंदिराची पुन्हा एकदा बांधणी करून देण्याचे ग्रामस्थांची मागणी आहे.तर वैयक्तिक प्रकार असेल तर अधिक तपास करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात असुन पुढील तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस करीत आहेत..