माणगांव येथील कालनदीच्या पाण्याचा आजही होत आहे उपसा कित्येक वर्षांपासून सरकारी कर्मचारीच करीत आहेत फसवणूक …

188
माणगांव येथील कालनदीच्या पाण्याचा आजही होत आहे उपसा कित्येक वर्षांपासून सरकारी कर्मचारीच करीत आहेत फसवणूक ...

माणगांव येथील कालनदीच्या पाण्याचा आजही होत आहे उपसा कित्येक वर्षांपासून सरकारी कर्मचारीच करीत आहेत फसवणूक …

माणगांव येथील कालनदीच्या पाण्याचा आजही होत आहे उपसा कित्येक वर्षांपासून सरकारी कर्मचारीच करीत आहेत फसवणूक ...

मीडिया वार्ता न्यूज
रायगड प्रतिनिधी

माणगांव :- माणगांव येथील कचेरी रोड विद्या नगर येथे असणाऱ्या बासीन रिव्हेरा कॉ.ऑफ हॉउसिंग सोसायटी द्वारे आज कित्येक वर्ष कित्येक महिने दिवस रात्र माणगांव येथील काल नदी मधून पाण्याचा पाईप द्वारे सोसायटीमध्ये पाणी वापरत आहेत.यांची माहिती पाठबंधारे यांना दिली असता पाठबंधारेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही तसेच त्याचा पाठपुरावा करून आदेश जाहीर केले नाही जवळ-जवळ या गोष्टीला दोन ते तीन महिने उलटून गेले तरीही पाठबंधारे विभागीय गप्प का यावर प्रश्न निर्माण होत आहे. तसेच यांचा कोणता हातभलं तर नाही ना असे आजूबाजूतील लोंकाना संशय निर्माण होत आहे. कारण बासीन बिल्डिंग चे अध्यक्ष तसेच त्यांचे सहकारी सरकारी कर्मचारी असून सरकारचीच नुकसानी करीत आहेत.

सदर मिळालेल्या माहितीनुसार पाठबंधारे अधिकारी अहिरे मॅडम याच्याशी चौकशी केली असता त्यांनी आम्हाला असे सांगितलं की बासीन रिव्हेरा चे सेक्रेटरी व अध्यक्ष यांनी आताच आमच्या जवळ प्रस्ताव दिला आहे. वरून मंजूर झाल्यावर तुम्हाला कळवितो आज जवळपास 2017 पासून या काल नदीमधून बासीन रिव्हेरा पाण्याचा उपसा करीत आहेत.माणगांव बाजारपेठेतील अनेक अशा बिल्डिंग नदी किनारी आहेत त्यांनी काल नदी येथून पाईप टाकून कोणतेही अधीसूचना न देता तसेच परमिशन न काढता स्वतःच्या व सोसायटी मध्ये राहणाऱ्या लोकांच्या फायद्यासाठी अशी अक्कल लढवली आहे. आज माणगांव नगरपंचायत कढून सोडण्यात येणाऱ्या समस्त माणगांवकराना पुरेपूर पाणी मिळत आहे तरी सुद्धा सरकारी कर्मचारीच कोणत्याही प्रकारची सूचना न देता काल नदीतून पाण्याचा मोठया प्रमाणात उपसा करीत आहेत तसेच पाठबंधारे च्या सह्यायाने स्वतः चा विचार करीत आहेत यावर कोणती कारवाई शासन करणार ?