मुंबई धारावीत चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार.

मुंबई:- धारावीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. धारावीत राहणार्‍या एका व्यक्तीने खाऊ देण्याच्या बहाण्याने चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला आहे. हा व्यक्ती एका खासगी कंपनीत चालक पदावर कार्यरत आहे.

तीन मुलींवर अत्याचार केल्यानंतर चौथ्या मुलीवरही अत्याचार केले. चौथ्या पीडित मुलीने पालकांकडे झाली हकीगत सांगितली. तेव्हा पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार केली आहे. आरोपी पळण्याच्य तयारीत असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. चौकशी दरम्यान आपण चार मुलींवर अत्याचार केल्याची कबुली त्याने दिली. तसेच पीडित मुलींपैकी दोन मुली या आरोपीच्या नातेवाईक असल्याचेही समोर आले आहे.

चार पीडित मुलींपैकी दोन मुली पाच वर्षाच्या आहेत, एक मुलगी सात तर एक मुलगी आठ वर्षाची आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here