हिंगणघाट 22 वर्षिय तरुणीने केली वणा नदीत उडी घेऊन आत्महत्या.

✒️ मुकेश चौधरी ✒️
उपसंपादक मिडिया वार्ता न्युज
📲7507130263📲
हिंगणघाट:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगणघाट येथील विरभगत सिंग वार्ड मधील एका 22 वर्षीय तरुणीने वणा नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. त्यामूळे शहरात एकच खळबळ उडाली असुन विविध चर्चेला उधाण आले आहे.
एक व्यक्ती राष्ट्रीय महामार्ग 44 वरुन दुचाकी मोटर सायकलने प्रवास करत होता, त्यावेळी हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणा-या वणा नदीच्या पुलावर त्याला लेडीज बैग दिसून आली. समयसुचकता दाखवुन त्याने यांची माहिती भ्रमणध्वनी द्वारा वडनेर येथील पोलीस स्टेशनला कळवली. हे क्षेत्र वडनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत नसल्याने वडनेर पोलिसानी याची माहिती हिंगणघाट पोलिसानी कळवीली.
मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास हिंगणघाट पोलीस घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तिथे एक लेडीज बैग पडून होती तिथे काही खळबळजनक घडले असे दिसून आले. मग पोलिसांनी नदी पात्रात शोध मोहीम राबविली असता नदी पात्रात विर भगतसिंग वार्ड येथील 22 वर्षिय तरुणी आशु प्रविण मेंढे हिचा मृत्यूदेह मिळुन आला.
कालच तरुणीच्या कुटुंबीयानी हिंगणघाट पोलीस स्टेशनला जाऊन आशु मेंढे ही घरुन बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. आज तीचा मृत्यूदेह वणा नदीच्या पात्रात दिसून आल्याने मेंढे कुटुंबियावर आभाळ कोसळले आहे. सदर मृत्यक तरुणी आशू मेंढे ही हिंगणघाट येथील खाजगी रुग्णालयात काम करत होती. तिने आत्महत्या केली की तीची हत्या करण्यात आली याच्या शोध हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पुढील तपास करत आहे.