राष्ट्रवादी युवक काँग्रेस सावनेर तालुका कार्यकारणी बैठक संपन्न.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 9923296442 📲
सावनेर:- राष्ट्रवादी युवक काँग्रेस सावनेर तालुका कार्यकारणी बैठक नुकतीच सावनेर येथे संपन्न झाली. यावेळी सावनेर विधानसभा अध्यक्ष कीशोर चौधरी व जिल्हा उपाध्यक्ष अमर जैन हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बैठकीचे आयोजन कपिल वानखेडे अध्यक्ष युवक राष्ट्रवादी सावनेर तालुका यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावनेर तालुक्यात पक्षाचा प्रसार व आगामी निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली व सावनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी नियुक्त्या देण्यात आल्यात व किशोर चौधरी यांनी कार्यकर्त्यांना नव्याने कामाला लागण्याचे आव्हान केले. यावेळी प्रमुख उपस्थिती दिनेश इंगोले, साबीर मिर्जा, सुधाकर तिबोले, मखसुद शेख, विजय पांडे, कांचन ढवंगाळे, राजु खाडे, विनोद कोथरे, पवन वानखेडे, अविनाश बांगरे, मंगेश चोरपगार, प्रज्वल पाटील, रोहित कडबे, सुमित चंद्रिकापुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी नियुक्ती करण्यात आली विजय पांडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सावनेर तालुका उपाध्यक्ष पदी कांचन सुरेशराव ढवगाळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सावनेर तालुका उपाध्यक्ष पदी अविनाश हिरामण बांगरे, कार्याध्यक्ष खापरखेडा युवक राष्ट्रवादी, रोहित कडबे उपाध्यक्ष भानेगाव खापरखेडा शहर आदी नियुक्ती प्रमाणपत्रासह देण्यात आले.