साईबर क्राईमवर जनजागृती ठाणेदार सूशील धोकटे यांचा अभिनव उपक्रम

56

साईबर क्राईमवर जनजागृती

ठाणेदार सूशील धोकटे यांचा अभिनव उपक्रम

साईबर क्राईमवर जनजागृती ठाणेदार सूशील धोकटे यांचा अभिनव उपक्रम
साईबर क्राईमवर जनजागृती
ठाणेदार सूशील धोकटे यांचा अभिनव उपक्रम

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी/धाबा:- अलिकडे साईबर गुन्ह्यात कमालीची वाढ होत आहे शहरी भागातील लोण आता ग्रामीण भागात ही पसरत जात आहे या गुन्ह्यांना रोखण्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न होत आहे तालुक्यातील धाबा उप पोलिस स्टेशन चे ठाणेदार सूशील धोकटे यांनी साईबर क्राईम रोखण्यासाठी अभिनव उपक्रम राबविला विद्यार्थ्यांना आधी साईबर क्राईम संदर्भात जनजागृती करण्यात आली यानंतर मानसशास्त्रावर आधारित परीक्षा घेण्यात आली
ठाणेदारानी जणता विद्यालयातील विद्यार्थ्यांना साईबर क्राईम संदर्भात जनजागृती करण्यात आली गुड टच..बॅड टच मोबाईल चा योग्य वापर आर्थिक व शारीरिक रित्या होणारी फसवणूक टाळण्यासाठी काय करावे कुणी ब्लॅकमेलींग करुन पैसे वसुल करत असतील तर कोणती भूमिका घ्यावी यांसह अनेक मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात आले यानंतर विस प्रश्नांची प्रश्नावली तयार करून विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन गुणवत्ता तपासण्यात आली या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला जनता विद्यालयात पार पडलेल्या या उपक्रमाप्रसंगी ठाणेदार सूशील धोकटे ..शिक्षक बबनराव पत्तीवार यांच्या सह अनेक शिक्षकांची उपस्थिती होती