वाढदिवसाच्या दिना निमित्त शिक्षणाआवश्यक वस्तूचा वाटप करून लोकांना नवी धारणा देऊन अनेक विध्यार्थ्यांना केली छोटीसी मदत
आपले गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी श्री. राजेंद्र झाडे

आपले गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी श्री. राजेंद्र झाडे
✍जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
9529811809
गोंडपीपरी : श्री. राजेंद्र झाडे यांनी आपल्या जन्म दिना निमित्त आज दि. २४/११/२१ ला जि प प्राथमिक शाळा डोंगरगांव येथे मुलांना बुक आणि पेन चे वितरण करण्यात येणार आहे ….आणी शाळेतील समस्या जाणून घेऊन ग्राम पंचायत डोंगरगांव च्या माध्यमातून जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार असे ग्राम पंचायत सदस्य श्री. राजेंद्र झाडे यांनी सांगितले तिथे उपस्थित सरपंच सौ. मंगला साजन झाडे, उपसरपंच श्री. नीलकंठ भाऊ लखमापुरे, ग्राम पंचायत सदस्य श्री. महेश भाऊ मडावी, शाळेचे मुख्यधापक श्री. आत्राम सर, शिक्षक राजेंद्र कोवे आणि समस्त विध्यार्थी/विद्यार्थीनी यांची उपस्थिती असून एक हात मदतीचा आणि बालकांना शिक्षणाची ओढ लागावी अशी अपेक्षा व्यक्त केले आहे आपल्या समाजात वाढदिवस अनेक पद्धतीने साजरी केली जाते परंतु असे काही करायचे आहे हे फक्त समाजातील काही लोकांनाच समजून येते त्यापैकी एक म्हणजे समाजात असणाऱ्या हितकर राजेंद्र झाडे यांनी जि. प. प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे सर्व विद्यार्थ्यांना बुक व पेन वाटप करून हे सिद्ध केले की आताच्या काळात शिक्षण किती महत्वाचे आहे हे दर्शविली आहे चला आपण ही देऊयात एक हात मदतीचा असे म्हणत सामाजिक कार्यकर्ते पुढे खंबीरपणे मदतीला आल्याचे दिसून येते.