आखेर विद्यार्थी हुजैफा याच्या मृत्यु प्रकरणात, आय एन टी स्कूल वनी पुरार च्या सचिव व क्रिडा शिक्षक यांना अटक
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-माणगांव तालुक्यातील गोरेगाव विभागामध्ये आयएनटी अकॅडमीक इंग्लिश स्कूल अँड हायस्कूल वनी पुरार मध्ये तालुका स्तरीय व्हॉली बॉल स्पर्धेदरम्यान आय एन टी स्कूल येथे १० वी कक्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थी हुजैफा डावरे याला भाला लागुन त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला होता त्यानंतर गोरेगाव पोलिसांकडून स्पर्धेच्या आयोजक कमिटी यांच्यावर भादवि कलम ३०४ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात पत्रकारांसोबत मृत मुलाच्या नातेवाईकांनी संवाद साधत या भालाफेक खेळाच्या सरावा दरम्यान शाळेतील कोणी शिक्षक उपस्थित नव्हते, घडलेल्या प्रकाराला शाळा जबाबदार असून शाळेच्या निष्काळजी पणामुळेच मुलगा गमावला असल्याचे म्हटले होते. पोलिसांनी देखील या प्रकरणात स्पष्ट भुमिका मांडली नव्हती, गुन्हा आयोजकांवर दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलिसांकडून अधिक तपासानंतरच या प्रकरणातील नक्की आरोपी कोणास धरता येईल हे स्पष्ट होईल असे सांगण्यात आले होते.
अखेर पोलिसांच्या सखोल तपासानंतर आय एनटी अकॅडमीक इंग्लिश स्कुल अँड हायस्कुलचे सचिव शोएब अब्दुल मजीद हुर्जुक तसेच क्रिडा शिक्षक बंडु शिवाजी पवार यांच्यावर गु. रजि. ११८ भादवि संहिता कलम ३०४ (ll) प्रमाणे दाखल करुन आरोपी यांना अटक करुन न्यायालयात हजर करुन मा. न्यायालयात दोषआरोप पत्र दाखल करण्यात आले असून आरोपी यांना अलिबाग येथील न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.