कर्जत तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश !
✒️संदेश साळुंके✒️
कर्जत रायगड प्रतिनिधी
✒️9011199333✒️
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर पक्ष प्रवेशाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये शिवसेनेच्या जिल्हा व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
कर्जत किरावली येतील शेळके बंधू सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्त्यांच्या जाहीर पक्ष प्रवेशाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मावळ लोकसभा निरीक्षक माधवी जोशी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नरेश जोशी, जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, कार्याध्यक्ष तानाजी चव्हाण, जैबुननीता शेख, हमीद शेख आदी उपस्थित होते. कर्जत तालुका भावी अध्यक्ष शंकर भुसारी, पनवेल तालुका अध्यक्ष डॉ. साईनाथ डोईफोडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हरेश मोकल यांनी प्रास्ताविकात, ‘भारतीय जनता पक्षाचे राजकारण काय चाललय? ईडी लावायची आणि त्या कार्यकर्त्याला आपल्याकडे घ्यायचे. त्यांच्याकडे गेलेला तो कार्यकर्ता स्वच्छ होतो. त्यांची वशिंग मशीन आहे. त्यांच्याकडे गेलेला स्वच्छ होतो, संत होतो. ईडी लावायची तेथे कपडे घाणेरडे नंतर फडणवीस काय करतात? समाजा – समाजामध्ये तेढ शिंदे गट काय करतय बाळासाहेबांनी तुम्हाला काय कमी केले? तुम्ही बिजेपीच्या वळचणीला गेलात. काही नेते शरद पवार साहेबांकडे होते तेंव्हा भ्रष्ट आणि आता स्वच्छ हे तुमचे काय चाललय.’ असा प्रश्न उपस्थित केला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खोपोली हजर सहसंपर्क प्रमुख हमीद शेख यांनी, ‘ मी 1985 चा शिवसैनिक आहे. माझ्या पक्षाने मला काही कमी केले नाही मात्र केवळ माधवीताईंसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहे.’ असे स्पष्ट केले. डॉ. साईनाथ डोईफोडे यांनी, जोशी उभयता शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य विभागाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात.’ असे सांगितले. तानाजी चव्हाण, 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी कर्जत विधानसभा क्षेत्रात आम्ही केवळ पाच जणांनी धुरा उचलली. पहिल्याच निवडणुकीनंतर सत्ता आली. त्यांनंतर आता पक्ष फुटला त्यामुळे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण राहणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारणात खूप स्थित्यंतरे होत आहेत. अनेक कृषी विषयक योजना आत्ताच्या राजकीय परिस्थितीमुळे माझ्या सारख्या कार्यकर्त्यामध्येही गोंधळ निर्माण झाला. माजी आमदार सुरेश लाड यांनी अनेकांना मोठे केले. परंतु त्या उपकाराची फेड अपकाराने होते याबद्दल खंत वाटते. असे सांगितले.
त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्ष जैबुननिता शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करण्यात आले. माधवी जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना, ‘विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. चहा विकणारे पंतप्रधान होऊ शकतो तर एक शेतकऱ्याची लेक किंवा सून खासदार का होऊ शकणार नाही? माझ्यावर शरद पवारांनी विश्वास दाखवून पक्षाचे कार्य करण्याचा आदेश दिला आहे. त्या आदेशाचे पालन प्रामाणिकपणे करण्याचा मी निर्धार केला आहे.’ असे स्पष्ट केले. सुरेश टोकरे यांनी, ‘मी जिल्हा कसा राष्ट्रवादी कॉंग्रेसमय करता येईल असे काम करणार असून सर्वांच्या सहकार्याने ते शक्य होणार आहे. त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल.’ असे स्पष्ट केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.