अलिबाग मधील सलग पराभवाने शेकापला हादरा
कुटुंबातील कलह, मविआमधील बिघाडीचा परिणाम
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग : एके काळी शेकापक्षाचा बालेकिल्ला असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला रायगड मध्ये जोरदार धक्का बसला आहे. सन 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सलग दोन विधानसभा निवडणुकीत झालेला दारूण पराभवाने आता अस्तित्वासाठी पक्ष नेतृत्वाला झगडावे लागणार आहे. कुटुंबातील कलह महाविकास आघाडी मधील बेबनाव आणि उमेदवार निवडीत झालेली चूक आदी कारणामुळे विधानसभा निवडणुकीत शेकापला सामोरे जावे लागेले.
महाविकास आघाडीत राहताना आघाडीचा धर्म पाळला नसल्याने पनवेलमध्ये मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. तेथे जर शेकाप आणि शिवसेना ठाकरे गट यांची आघाडी झाली असती तर काही प्रमाणात भाजपला शह देण्यात यश मिळाले असते . कर्जत मध्ये शेकापणे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना दिलेला उघड पाठिंबाही तितकाच कारणीभूत ठरला. प्रचार सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जयंत राव उलटा-सुलटा खेळ करू नका,असा इशारा वजा संदेश दिला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याचा परिणाम अलिबाग मधील मतदानावर झाल्याची दिसते. काँग्रेसची मते आपल्यालाच पडतील असा छातीठोक दावा शेकाप नेते जयंत पाटील यांनी केला होता. प्रत्यक्षात काँग्रेसची अपेक्षित मतेच एका पक्षाला पडली नाहीत. त्या मताचे विभाजन झाल्याचे दिसून येते.
कुटुंबातील कलाने तर शेकापक्षाला मोठा तोटा सहन करावा लागला. हे कोणीही नाकारू शकत नाही.माजी आमदार पंडित पाटील, आस्वाद पाटील, चित्रा पाटील,भावना पाटील , सवाई पाटील ही घरातील हक्काची नेते मंडळीच निवडणूक प्रचारापासून अलिप्तच राहिली.त्याचाही मोठा परिणाम शेकापक्षाला झाल्याचे स्पष्ट दिसते. ती जर मंडळी सक्रिय झाली असती तर कार्यकर्ते आणखी जोमाने निवडणुकीत उतरले असते. पण कुटुंब कलह मिटवण्यात शेकाप नेतृत्वाला यश आलेच नाही, त्याची परिणीती अखेर पराभवात झाली. उमेदवार निवडतानाही शेकाप नेतृत्वाने चित्रलेखा पाटील यांच्या ऐवजी सुप्रिया पाटील यांना उमेदवारी दिली असती तर कदाचित निकालात मोठे परिवर्तन झाले असते. शिवाय कुटुंबात एकोपा राहिला असता. चित्रलेखा पाटील यांना 2019 च्या निवडणुकीचे टार्गेट ठेवून प्रचाराची धुरा सोपवली गेली असती तर त्यांनाही काम करण्याची संधी मिळाली असती. कोणत्याही प्रकारची निवडणूक न लढविणाऱ्या चित्रलेखा पाटील यांनी आधी पंचायत समिती ,जिल्हा परिषद अशा पायऱ्या चढतच विधानसभेची निवडणूक लढविणे अपेक्षित होते. कारण शेकापक्षांमध्ये दत्ता पाटील वगळता मीनाक्षी पाटील ,जयंत पाटील पंडित पाटील यांनी आधी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे निवडणूक लढवीतच विधानसभेच्या पायऱ्यांवर पाऊल टाकले आहे. ते पक्षातील आणि ज्येष्ठांना रुचले नसल्याचे निकालावरून दिसून आले.ओळख