श्रीवर्धन समुद्रकिनारी स्मशानभूमी मार्गावर अनधिकृत स्टॉल; ग्रामस्थांचा संताप, तात्काळ हटविण्याची मागणी

36

श्रीवर्धन समुद्रकिनारी स्मशानभूमी मार्गावर अनधिकृत स्टॉल; ग्रामस्थांचा संताप, तात्काळ हटविण्याची मागणी

निलेश भुवड
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
मो. 8149679123

श्रीवर्धन |श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याजवळील अवधूत मंदिरा कडून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर एका अनधिकृत स्टॉलने अक्षरशः अतिक्रमण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मार्गावरून अंतविधीसाठी ग्रामस्थांची सतत ये-जा होत असते. अशा संवेदनशील ठिकाणी उभारलेली ही टपरी ग्रामस्थांच्या अडथळ्याचे चे कारण ठरत असून, तिच्यामुळे वाहतुकीसाठी सुद्धा अडथळा निर्माण होत आहे.

स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, “ही टपरी तात्काळ हटवली नाही तर पुढील काळात या मार्गावर आणखी स्टॉल्स व हातगाड्या उभ्या राहून संपूर्ण रस्ता व्यापला जाईल. अंतविधीसाठी येणाऱ्या लोकांना त्रास होईल, तसेच परिसराची पवित्रता बिघडेल.”

ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने कारवाई करून संबंधित अनधिकृत स्टॉल हटवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाकडे संबधित विभागाने गांभीर्याने पाहून लवकरात लवकर मार्ग मोकळा करावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त होत आहे.