ग्राम पंचायत सावली वाढोणा खुर्द येथे सरपंच व सचिवांचा मनमानी कारभारमुळे संडास गेले चोरीला.

48

ग्राम पंचायत सावली वाढोणा खुर्द येथे सरपंच व सचिवांचा मनमानी कारभारमुळे संडास गेले चोरीला.

लाभार्त्याच्या घरी शौचालाय नसल्याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड.

युवराज मेश्राम कळमेश्वर तालुका प्रतिनिधी  
कळमेश्वर:- तालुक्यातील 10 कि मी अंतरावर असलेल्या सावळी (वाढोणा) येथील सरपंच व सचिवाच्या मनमानी कारभारा मुळे शौचालया मध्ये हजारो रुपयाचा घोळ झाल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. ग्रामपंचायतच्या शौचालय योजना अंतर्गत येणाऱ्या प्रधान मंत्री ग्राम शौचालय अंतर्गत ही योजना भारत सरकार च्या वतीने गावपातळीवर हागणदारी मुक्त झाले पाहिजे या दृष्टीकोनातून शासन शौचालया करीत 12000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ग्राम पंचायत मार्फत जमा करते. परंतु सावळी वाढोणा खुर्द येथील 1 जाने 2019 ते 10 ऑक्टो 2020 पर्यंत माहितीच्या अधिकारात युवराज मेश्राम यांनी माहिती मागितली असता असे निदर्शनात आले कि, शौचालायचे बांधकाम न करताच राजू नागोराव कुकडे याच्या खात्यात सरपंच सचिवाने 12000 रुपये जमा करण्यात आले या पैकी 5000 रुपये सरपंच यांनी लाभार्त्या कडून (राजू नागोराव कुकडे यांनी ग्राम पंचायत चपराश्याच्या हातून देण्यात आले अशी माहिती राजू कुकडे यांनी सांगितले.

त्याच प्रमाणे गावातील अनेक लाभार्थ्या सोबत असा व्यवहार झाला असावा असा गावकऱया मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तसेच अनेक लाभर्त्या सोबत असाच व्यवहार झाला असावा असे गावातील लोकांची शंका आहे तसेच अनेक लभ्यर्थिनी संडास बांधकाम अजून पर्यंत केले नाही या मुळे गावातील संडास चोरीला गेल्यास दिसत आहे गावातील काही लाभार्थी सरपंच सचिवांच्या मद्ध्येमातून स्वतःचा नावी घर नसून सुद्धा त्यांच्या नावाने एका एका घरी दोघां दोघाना संडास देण्यात आले आहे एक आईच्या नावी, म्हणजे छाया चंद्रशेखर बागडे तर एक मुलगा कृणाल चंद्रशेखर बागडे मुलांच्या नावी संडास मंजूर करण्यात आला व शासना कडून रक्कम सुद्धा मिळवून दिल्या गेली एकाच घरच्या दोघां दोधांच्या नावाने संडास पैसे शासना कडून देण्यात आले ही फसवे गिरी नाही कां ? या मुळे येथील सरपंच व सचिव यांनी लाभार्थ्या कडून काही वसुली केली असावी असा अंदाज गावकऱ्या मध्ये निर्माण झालेला आह। तसेच युवराज मेश्राम पत्रकार यांनी लाभार्थी राजं कुकडे यांना या बाबत माहिती विचारली असता त्यांनी सांगितले कि मी सरपंचाला संडास करीत माहिती विचारली व त्यांनी मला सांगितले कि, शासना तर्फे 12000 रुपये मिळतात त्या तुन 5000 रुपय प्रथम तुमि मला दय। मी तुम्हाला 12000 रुपय शौचालयाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खात्यात करून देतो.
अशी माहिती राजू कुकडे यांनी पत्रकार युवराज मेश्राम यांना दिल. वास्तविक पाहता राजू कुकडे यांचा नावाने घर नसून हे घर त्यांच्या आजीच्या नावाने आहे. या मुळे गावात व तालुक्यात अनेक शंका कुशंका निर्माण होत आहे किव्हा सरपंच व सचिवाने असाच प्रकारचा संडासचा योजने चा लाभ इतर गावकऱया देण्यात आला असावा अशी शंका नागरिक मध्ये निर्माण झाली आह। ही फसवेगिरी योजना गावात राबवित असल्याचे दिसून आल.

तरी कसल्या प्रकारची कारवाही संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सरपंच, सचिव व इतर अधिकाऱ्यावर करून श्री युवराज मेश्राम, राजू कुकडे व इतर गावकर्यांना शासनांनी न्याय मिळून द्यावी अशी कळकळीची विनंती केलीली आह.