पाच वर्षीय मुलीचा खून करून बलात्कार, विकृत नराधमाला अटक.
ओडिशा:- मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विकृत तरुणाने पाच वर्षीय मुलीचा खून करून तिच्यावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ओडिशामधील नयागढ भागात एक तरुणाला चाईल्ड पॉर्न पाहण्याचे व्यसन होते. त्याने शेजारी राहणार्या एका पाच वर्षीय मुलीचे अपहरण केले आणि एका निर्जन ठिकाणी नेले. लहान मुलीने त्याला विरोध करताच त्याने मुलीचा गळा आवळून तिचा खून केला. खून केल्यानंतर तरुणाने मुलीच्या मृतदेहावर बलात्कार केला.
या प्रकरणी पोलिसांनी तपास करून त्याच्या मुसक्या आवळल्या. पण आपल्या मुलाने असे काही केलेच नाही असा दावा आरोपीच्या आई वडिलांनी केला आहे. इतकेच नाही तर पीडित मुलीच्या पालकांनीही आरोपी निर्दोष असल्याचे म्हटले आहे. आमच्या मुलाला आरोप कबुल करण्यासाठी पाच लाख रुपये दिल्याचे आरोपी मुलाच्या आईने म्हटले आहे. तसेच पोलिसांनी आपल्या मुलावर मानसिक आणि शारिरीक अत्याचार केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.